Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जांभळं कधी खाऊ नये? एका दिवसात किती खावू शकता? जाणून घ्या

जांभळं कधी खाऊ नये? एका दिवसात किती खावू शकता? जाणून घ्या 


उन्हाळ्यात जांभुळ खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. चवीला आंबट गोड असणारी जांभळांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभुळ खूप उपयुक्त असे फळ आहे. जांभळात ग्लुकोजची मात्र कमी असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फळ वरदान आहे. यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हृदयदेखील निरोगी ठेवते. पण तुम्हाला माहीतीये जांभळं खाण्याची योग्य वेळ कोणती? आज आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर सांगणार आहोत. तसंच, एका दिवसात किती जांभळं खायची हेदेखील सांगणार आहोत. 

जांभळाचे फायदे जाणून घ्या?
जांभळात व्हिटॅमिन सी आणि आयर्नची मात्रा मोठ्या प्रमाणात आढळते. हे फळ हिमोग्लोबीनदेखील वाढवते आणि त्यात असलेले आयर्न ब्लड प्युरिफायर म्हणूनही काम करते. त्याव्यतिरिक्त यात असलेले निरोगी गुणधर्म चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, सुरकुत्या, पुटकुळ्या यापासून बचाव करते. जांभळात अँटीऑक्सिडेंट्स आणि पोटेशियम सारख्या मिनरल्सचा एक चांगला स्त्रोत असतो. ज्यामुळं हृदयासंबंधी आजार दूर ठेवण्यास फायदेशीर असतात. 

कोणत्या वेळी खावी जांभळं?

कोणतेही फळ खाण्याचा योग्य वेळ असतो. त्यावेळी ते फळ खाल्लं तरंच त्याचा फायदा होतो. जांभळं कोणत्या दिवशी खावी हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. रिपोर्ट्सनुसार, जांभुळ दिवसभरात कोणत्याही वेळी खाऊ शकतो. जांभळं खाण्यची सगळ्यात चांगली वेळ ही जेवल्यानंतरची आहे. यामुळं तुमचं मेटाबॉलिज्म आणखी वाढवण्यास मदत करते आणि जेवण आरामात पचायलादेखील मदत करते. फक्त एक लक्षात घ्या की हे फळ रिकाम्या पोटी खाणे चांगले नाही. 

जांभुळ खाल्लानंतर हे पदार्थ खाऊ नका
जांभुळ खाल्ल्यानंतर कधीच लगेच पाणी पिऊ नका. नाहीतर अन्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जांभुळ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने डायरिया, अपचन यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळं शक्यतो जांभुळ खाल्ल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनंतर पाणी प्या. 

जांभुळ खाल्ल्यानंतर कधीच दुधाचे पदार्थ किंवा डेअर प्रोडक्ट खावू नका हे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. यामुळं पोटात गॅस निर्माण होणे व पाचनसंबंधी समस्या निर्माण होऊ शकता का दिवशी किती जांभळं खावी? जांभळं खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. पण जांभळांचे फायदे मिळवण्यासाठी एकाच दिवसांत 100 ग्रॅम जांभळं खावू शकतात. जांभळांचा रसदेखील एका दिवसांत 3 ते 4 चमचे इतका घेऊ शकता. 
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ' सांगली दर्पण 'याची पुष्टी करत नाही.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.