Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावधान! " जगभरात येणार कोरोना पेक्षाही भयंकर महामारी ", तज्ञानी व्यक्त केली चिंता

सावधान! " जगभरात येणार कोरोना पेक्षाही भयंकर महामारी ", तज्ञानी व्यक्त केली चिंता 


जगभरात पुन्हा एकदा कोरोनासारख्या महामारीचा धोका निर्माण झाला असून, यावेळी परिस्थिती २०२० पेक्षाही वाईट होणार आहे. ब्रिटिश तज्ज्ञांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे. ब्रिटनचे माजी चीफ सायंटिफिक एडवाइजर सर पॅट्रिक वालेन्स यांनी दावा केला आहे की, आणखी एक भयानक महामारी दारात उभी आहे. हे लक्षात घेऊन सर्वांनी तयारी करावी. सध्या जगातील अनेक देशांमध्ये निवडणुका सुरू आहेत, लोकांनी निवडणुकांमध्ये असे मुद्दे मांडले पाहिजेत.

पॅट्रिक वालेन्स म्हणाले की, आता येणाऱ्या महामारीला थांबवणं जवळजवळ अशक्य आहे. निवडणुकीत हा महत्त्वाचा मुद्दा बनवा, असं त्यांनी ब्रिटनच्या जनतेला सांगितलं. तसेच पॅट्रिक वालेन्स यांनी सर्व देशांच्या सरकारांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. पॅट्रिक वालेन्स हे एप्रिल २०१८ ते २०२३ पर्यंत ब्रिटनचे चीफ सायंटिस्ट एडवायजर होते. याच कार्यकाळात ब्रिटनसह संपूर्ण जगाला कोरोनाशी सामना करावा लागला होता. 

वालेन्स यांनी कोरोनाविरुद्ध धोरणे आखली, त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना 2022 मध्ये सर ही पदवी देण्यात आली. अशा परिस्थितीत पॅट्रिक वालेन्स यांनी दिलेल्या गंभीर इशाऱ्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. ते म्हणाले, 2020 मध्ये कोरोनामुळे योग्य उपचार लोकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत, यावेळी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे, जेणेकरून लोकांपर्यंत उपचार आणि कोरोना ही लस सहज पोहोचू शकेल.

जगातील G-7 देशांना वालेन्स यांनी सांगितलं की, अशा परिस्थितीत तातडीने कारवाई करणं महत्त्वाचं आहे, कोरोनाच्या काळात निर्माण झालेली यंत्रणा नुकतीच शिथिल करण्यात आली आहे. या निष्काळजीपणाचा परिणाम आगामी महामारी असेल. याला सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय समन्वय आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावाचाही त्यांनी उल्लेख केला. 2020 मध्ये कोरोनाने जगभरात दहशत निर्माण केली होती, ज्यामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.