Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चालतांना वारंवार श्वास लागतो? मग ' या ' गभींर आजाराला देताय आमंत्रण

चालतांना वारंवार श्वास लागतो? मग ' या ' गभींर आजाराला देताय आमंत्रण 


आपण जरासे चाललो अथवा आपण कुठतेरी गेल्यावर जिना जरी चढलो तरी आपल्याला लगेचच धाप लागते. अशावेळी आपण नक्की काय करावे हे आपल्याला समजतच नाही. परंतु या आजाराकडे दुर्लक्ष करणे हे आपल्यासाठी हानिकारकही ठरू शकते. सारखी सारखी धाप लागणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. आपल्याला फार मोठा त्रासही असू शकतो. तेव्हा या लेखातून आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. 


आपल्याला एका मिनिटाच्या कालावधीत नेहमीपेक्षा जास्त वेळा श्वास घेताना श्वास किंवा धाप जास्त प्रमाणात लागत असेल तर अशावेळी आपल्याला हायपरवेन्टिलेशनचा त्रास असण्याची शक्यता असते. यात गुदमरल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, धाप लागणे अशा समस्या होऊ शकतात. धाप लागणे हा काही विशिष्ट आजार नाही परंतु यामुळे एका मोठ्या आजाराला तुम्ही निमंत्रण देऊ शकता. ब्राँकायटिससारख्या समस्येमुळे फुफ्फुसांमध्ये जळजळ होते त्यातून यामुळे एन्सेफेसमध्ये असलेल्या लहान-लहान पिशव्या नष्ट होऊ शकतात. 

वारंवार धाप लागण्यामागे कोणता आजार असू शकतो?

1) वारंवार श्वास लागण्यामागे दम्याचा आजार असू शकतो, तुम्हाला जर का जास्त प्रमाणात दमा असेल तर त्यासाठी श्वासनलिकमध्ये सूज आल्याने एखाद्या व्यक्तीला श्वासोच्छावासाचा त्रास होतो. 

2) जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्लमोनरी एम्बोलिझमची समस्या असेल तर फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. ज्यामुळे छातीत दुखणे, श्वासोच्छवासाच्या तक्रारी उद्भवणे, हृदयाची गती वेगवान होणे अशा समस्या उद्धभवू लागतात.

3) शरीरात जर का पाण्याची कमतरता असेल तर तुम्हाला श्वासोत्छावासाचा त्रास होऊ शकतो. पाण्याच्या अभावीच शरीरातील पेशींना पुरेशी उर्जा मिळत नाही आणि डिहायड्रेशनशी समस्या उद्भवू शकते. तेव्हा अशावेळी आपल्याला योग्य ती काळजी घ्यावी लागते. अशावेळी डिहाड्रेशनमुळे श्वास लागण्याची समस्या उद्भवू शकते.

4) इन्फेक्शन्समुळेही श्वास लागण्याची समस्या ओढवू शकते. छातीत जर का न्यूमोनियासारखा आजार झाला असेल तर श्वास घेण्यात अडचणी होऊ शकतात. ज्यामुळे एखादी व्यक्ती ही जास्त प्रमाणात छापा टाकू शकते. जर या संसर्गावर बराच काळ उपचार झाला नाही तर फुफ्फुसात द्रव भरला जातो आणि एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रासही होतो. 

काय करावे उपाय?

आपल्याला या आजारापासून जर का वाचायचे असेल तर आपल्याला अल्कोहोल किंवा धू्म्रपान करणे टाळायला हवे. फुफ्फुसांच्या आरोग्य नीट ठेवण्यावर भर ठेवावा. असावेळी कपालभाती, प्राणायम, अनुलोम विलोम यांसारखे प्राणायम करावे. जास्त प्रमाणात हा त्रास वाढला तर आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. अशावेळी नियमित व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

(टीप: वर दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. 'सांगली दर्पण 'याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.