Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांची प्रचारात मुसंडी

शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांची प्रचारात मुसंडी 


सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी घटकपक्षांचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एकसंघ शक्तीने प्रचारात मुसंडी मारली. त्यामुळे मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. घरभेटी, सभा बैठकांचा धडाका सुरू आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना नेते-आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते- आमदार डॉ. विश्वजीत कदम, शिवसेना – उपनेते-जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या सभांमुळे – कार्यकर्त्यांमध्ये वेगळे चैतन्य निर्माण झाले आहे. 

पक्ष निरीक्षक आदित्य शिरोडकर सर्व निवडणूक प्रचारप्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, अभिजित पाटील, जिल्हा संघटक बजरंग पाटील, दिगंबर जाधव पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर समन्वय साधत आहेत. पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास – आघाडीतील सर्व घटकपक्षांनी एकत्र येत चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचे रान उठविले. चंद्रहार पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघाचा अनेक वेळा दौरा केला. त्यांनी केलेली सामाजिक कामे आणि जनतेतून मिळणारा प्रतिसाद यामुळे त्यांचा विजय सुकर ठरणार आहे.

मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, कडेगाव-खानापूर, आटपाडी आणि सांगली या सर्वच विधानसभा मतदारसंघांतून चंद्रहार पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तासगाव- कवठेमहांकाळमधून राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि त्यांचे चिरंजीव रोहित पाटील, कडेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजीत कदम, मिरजमधून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकसंघपणे चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचे रान उठविले आहे. आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चंद्रहार पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता, ते विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी अचूक नियोजन करीत सांगली जिल्ह्यातील घटकपक्षांतील सर्वच नेते, कार्यकर्ते, तसेच शिवसैनिकांना नियोजनबद्ध कार्यरत केले. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीने बाजी मारत उमेदवार चंद्रहार पाटील यांचे पारडे जड केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.