Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनपाची घरपट्टी ऑनलाईन सेवा सुरु - ३० जूनपूर्वी घरपट्टी भरल्यास १० टक्के सवलत - शुभम गुप्ता आयुक्त , मनपा

मनपाची घरपट्टी  ऑनलाईन सेवा सुरु - ३० जूनपूर्वी घरपट्टी भरल्यास १० टक्के सवलत - शुभम गुप्ता आयुक्त , मनपा


सांगली महापालिकेची घरपट्टीची बिले आता ऑनलाईन भरता येणार - आयुक्त शुभम गुप्ता यांची माहितीआज झालेला पत्रकार परिषदेत दिली आहे. ५ बिल भरणा केंद्रे आणि २३ पॉस मशिनदवारे ऑनलाईन सेवा सुरू. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेची घरपट्टीची बिले आता नागरिकांना ऑनलाईन भरता येणार आहेत. अशी माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. घरपट्टीची बिले ऑनलाईन भरता यावीत यासाठी ५ बिल भरणा केंद्रे आणि २३ कलेक्शन कर्मचारी यांना नियुक्त करण्यात आले असून या सर्वाना पॉस मशिन देण्यात आली आहे. त्यामुळे या सेवेदवारे नागरिक आपली घरपट्टीची बिले ऑनलाईन भरून आपली गैरसोय टाळू शकतात. तसेच ३० जूनपूर्वी घरपट्टी भरल्यास नागरिकांना १० टक्के सवलत मिळेल असेही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले. 

आयुक्त गुप्ता म्हणाले  कि, जानेवारी २०२५ पासून महापालिकेच्या सर्व कर विभागांची बिले हि कागद लेस होतील. सर्व बिले ऑनलाईन भरता येणार आहेत. सध्या घरपट्टी विभागामधील बिलांची ऑनलाईन भरण्याची सोय करण्यात आली आहे. यामध्ये नागरिक आमच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडे ऑनलाईन स्वरूपात बिले पेमेंट करू शकतात आणि त्यांना त्याची रिसीट सुद्धा ऑनलाईन मोबाईलवर उपलब्ध केली जाईल. याचबरोबर ज्या नागरिकांना घरपट्टी बिले ऑनलाईन स्वरूपात हवी आहेत त्यांच्यासाठी मोबाईलवर बिलाचा मेसेज देण्याची सोय करण्यात आली आहे.. या मेसेजमध्ये आलेल्या लिंकद्वारे आपण युपीए पेमेन्ट करू शकता आणि  पीडीएफ स्वरूपात आपल्या मोबाईलवर पाठवली जाणार आहे. सर्व प्रकारची बिले पावती लेस करण्याच्या हेतून आणि नागरिकांना बिले भरण्यासाठी महापालिकेत येण्याचा वेळ वाचावा यासाठी ऑनलाईन सेवा महापालिका सुरु करीत असल्याचेही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले. 
दरम्यान, ३० जूनपूर्वी जे नागरिक आपली घरपट्टीची बिले भरतील त्यांना १० टक्क्यांची सवलत देण्यात येईल तर जुलै मध्ये ५ टक्के सवलत देण्यात येईल आणि त्यानंतर संबंधित मालमत्ता धारकाला कोनतीही सवलत असणार नाही तर पुढील कारवाई महापालिका प्रशासन करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ३० जूनपूर्वी जे नागरिक आपली घरपट्टीची बिले ऑनलाईन ऑफलाईन भरतील त्यांना १० टक्केची सवलत दिली जाईल याचा लाभ घ्यावा असे आवाहनही आयुक्त गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत केले. यावेळी उपआयुक्त वैभव साबळे आणि उपायुक्त शिल्पा दरेकर उपस्थित होत्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.