Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

परीचारिच्याकांच्या कार्याला सलाम! जागतिक परिचररिका दिनाच्या सांगली दर्पण परिवाराकाडूनं हार्दिक शुभेच्छा

परीचारिच्याकांच्या कार्याला सलाम! जागतिक परिचररिका दिनाच्या सांगली दर्पण परिवाराकाडूनं हार्दिक शुभेच्छा 


आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन ( 2024) 12 मे रोजी साजरा केला जाणार आहे. आधुनिक नर्सिंगचे जनक फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 मे रोजी जगभरात परिचारिका दिन साजरा केला जातो. हा दिवस आरोग्य सेवा क्षेत्रातील परिचारिकांच्या कार्याला समर्पित केला जातो. परिचारिकांच्या आरोग्य क्षेत्रातील आणि वैद्यकीय कार्यातील महत्त्वपूर्ण योगदानाच्या सन्मानार्थ परिचारिका दिन जगभरात साजरा केला जातो. परिचारिकांच्या सेवाभावनेला सलाम करण्याचा हा दिवस आहे. 1974 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला. इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेसने हा दिवस दरवर्षी 12 मे रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला. जागतिक परिचारिका दिनानिमित्त तुम्ही परिचारिकांना वॉलपेपर पाठवून शुभेच्छ देऊ शकता.


फ्लोरेन्स नाइटिंगेल कोण होती?

फ्लॉरेन्स नाइटिंगेल ज्यांना लेडी विथ लॅम्प म्हणून ओळखले जाते. त्या एक महान परिचारिका होत्या. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले. 12 मे 1820 रोजी फ्लॉरेन्स, इटली येथे जन्मलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल या श्रीमंत कुटुंबातील असूनही लोकांच्या सेवेसाठी परिचारिका बनण्याचा निर्णय घेतला. 1854 मध्ये क्रिमियन युद्धादरम्यान त्यांनी ज्या प्रकारे सैनिकांची सेवा केली त्या इतर परिचारिकांसाठी एक उदाहरण बनल्या. नाइटिंगेल यांनी क्रिमियाला जाऊन हॉस्पिटलची खराब स्थिती सुधारली आणि लष्करी जवानांचे प्राण वाचवले. 

आज, परिचारिकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर परिचारिकांना 'नाईटिंगेल प्लेज' म्हणजेच शपथ दिली जाते. रुग्णांना उत्कृष्ट आणि दर्जेदार सेवा दिल्याबद्दल काही निवडक परिचारिकांची फ्लॉरेन्स नाइटिंगेल पदकसाठी निवड केली जाते. हे पदक आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठे पदक आहे.

कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या सेवेची आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यावेळी अनेक डॉक्टर ऑनलाइन सल्ले देत होते. या वेळी परिचारिका रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार आणि सेवा करण्यात व्यस्त होत्या. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी परिचारिकांनी आपला जीव धोक्यात घालून लढा दिला. या कठीण काळात अनेक परिचारिकांना आपला जीव गमवावा लागला. आज मोठी मोठी रुग्णालये परिचारिकांच्या स्टाफशिवाय चालवणे अशक्य आहे. रुग्णालयाची व्यवस्था सुरळीत चालवण्याची जबाबदारी परिचारिकांच्या खांद्यावर आहे.

सर्व परिचारिकांना आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

देऊया पाठबळ त्यांच्या धैर्याला...
सेवावृत्तीला...
करुया गौरव आरोग्य सेविकांचा!
जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा!

एकासाठी काळजी करणे म्हणजे प्रेम
सगळ्यांसाठी काळजी करणे म्हणजे नर्सिंग
परिचारिका दिनाच्या शुभेच्छा...!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.