Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-आंघोळीच्या साबणावरून बायकोने नवऱ्याला धुतले, पकडीने अंगठाच फोडला

सांगली :-आंघोळीच्या साबणावरून बायकोने नवऱ्याला धुतले, पकडीने अंगठाच फोडला 


सांगलीमध्ये नवरा बायकोत आंघोळीच्या साबणावरून वाद झाला. अन् बायकोने नवऱ्याचा अंगठा फोडल्याची घटना घडली आहे. बाथरुममध्ये अंघोळीचा साबण कुठे ठेवला? असं बायकोने विचारले असता नवऱ्याने उडवा उडवीचं उत्तर दिलं. याचं रूपांतर हाणामारीत झालं. रागाच्या भरात नवऱ्याने बायकोच्या कानशिलात लगावली. तर संतापलेल्या बायकोने पकडीने थेट नवऱ्याचा अंगठाच  फोडला. 

यासंदर्भात नवऱ्याच्या तक्रारीवरून बायकोसह सासरच्या चौघांविरोधात सांगलीच्या संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ मे रोजी ही घटना सांगलीत संजयनगर येथे पाटणे प्लॉटमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये १३ मे रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. नवरा बायकोमधील भांडणं  काही नवीन नाहीत. मात्र आता फक्त एक साबण या दोघांमधील भांडणाचं कारण ठरला आहे. आपण नक्की घटना काय आहे ते जाणून घेऊ या. 

नक्की काय घडलं?

८ मे रोजी सकाळी बायको अंघोळीसाठी जात होती. त्यावेळी तिला साबण सापडला नाही. तिने नवऱ्याला साबण कुठे आहे, असं विचारलं. यावर तिच्या नवऱ्याने साबण बाथरूममध्ये असेल, असं उत्तर  दिलं. याचा राग येवून बायकोने नवऱ्याला अपशब्द वापरले. तुम्ही मला तुम्ही मला साबण आणून देऊन दमताय का? असा प्रश्न तिने विचारयावरून त्या दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. नवऱ्याने बायकोला शिवीगाळ केली. बायकोने नवऱ्याच्या हाताच्या अंगठ्यावप पक्कडने वार केला. यामध्ये नवऱ्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. या भांडणावेळी सासू, सासरे, चुलत सासरे यांनीही तिच्या नवऱ्याला दमदाटी केली. आमच्या मुलीला त्रास देतो, तुला सोडत नाही असं त्यांनी धमकावलं. त्यामुळे या नवऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार सांगलीतून समोर आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.