Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतात झालं माकडाच्या मोती बिंदूचं पहिलं ऑपरेशन :, 'या' डॉक्टरांनी केली कमाल

भारतात झालं माकडाच्या मोती बिंदूचं पहिलं ऑपरेशन :, 'या' डॉक्टरांनी केली कमाल 


आपण माणसांची शस्त्रक्रिhशरीरातील भागांच्या अनेक किचकट शस्त्रक्रिया होतात. त्यामध्ये डोळ्याची शस्त्रक्रिया अत्यंत किचकट आणि महत्वपूर्ण असते.पण आपण नेहमी माणसांच्या शस्त्रक्रियेबद्दल ऐकलंय कधी माकडाच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे.

हरियाणाच्या लाला लाजपतराय विद्यापीठात (LUVAS) प्राण्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी कामगिरी झाली आहे. येथील प्राणी रुग्णालयात electric shock मुळे जखमी झालेल्या माकडावर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही हरियाणामध्ये माकडावर झालेली पहिलीच मोतीबिंदू शस्त्रक्रिया असल्याचे LUVAS कडून सांगण्यात आले.

प्राण्यांच्या शस्त्रक्रिया आणि रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. एन. चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. हिसारच्या रहिवासी प्राणीप्रेमी मुनीश यांनी जखमी माकडाला उपचारासाठी लुवास येथे आणले होते. जखमांची प्राथमिक उपचारं करून माकडाला चालता येऊ लागले. परंतु त्यानंतर त्यांना लक्षात आले की माकडाला दिसत नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले.

प्राणी डोळा विभागात तपासणी केली असता डॉ. प्रियंका दुग्गल यांना माकडाच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. त्यापैकी एका डोळ्याच्या glassy substance ( vitreous) लाही देखील इजा झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी दुसऱ्या डोळावर शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे आता माकडाला पुन्हा दिसू लागले आहे. मोतीबिंदू ही एक सामान्य डोळ्यांची समस्या आहे ज्यामुळे पूर्ण किंवा अंशत: दृष्टीचे लोप होते. पण लुवासच्या डॉक्टरांनी केलेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे हरियाणातील प्राण्यांच्या उपचारामध्ये नवीन दिशा मिळाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.