Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांना अटक!

केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांना अटक!


आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार स्वाती मालीवाल यांना देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांना अटक केली. खासदार मालीवाल यांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या अहवालात २ छायाचित्रांसह स्वाती यांच्या डोळ्यावर आणि पायावर जखमेच्या खुणा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. देहली पोलिसांनी मालीवाल यांची 'एम्स' रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. १३ मे या मारहाणीची घटना घडली होती.

बिभव कुमार यांनी खासदार स्वाती मालीवाल यांच्या विरोधात तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात बलपूर्वक प्रवेश केला आणि त्यांना थांबवल्यावर गोंधळ घातला, तसेच कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली, असे विभव कुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे. जेथे मुख्यमंत्र्यांच्या घरातसुद्धा महिला सुरक्षित नसतील, तर राज्यात महिलांच्या सुरक्षेची कशी स्थिती असेल, याचा विचारच न केलेला बरा !

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.