Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर :-बातमी का दिली नाही म्हणत भर रस्त्यात पत्रकारला मारहाण :, शिंदे गटाच्या राजेखान जमादारवर गुन्हा दाखल

कोल्हापूर :-बातमी का दिली नाही म्हणत भर रस्त्यात पत्रकारला मारहाण :, शिंदे गटाच्या राजेखान जमादारवर गुन्हा दाखल 


कोल्हापूर : मुरगूड (ता. कागल) येथील दैनिक 'सकाळ'चे बातमीदार प्रकाश तिराळे यांना मारहाण केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचा  जिल्हाप्रमुख राजेखान कादरखान जमादार  याच्यावर गुन्हा दाखल झाला.

तसेच उचलून नेण्याची धमकी देत मारहाण करणाऱ्या आसिफखान ऊर्फ मॉन्टी आसदखान जमादार व संदीप अशोक सणगर (सर्व रा. मुरगूड) यांच्यावरही गुन्हा नोंद झाल्याची माहिती करवीरचे पोलिस  उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी दिली. याची नोंद मुरगूड पोलिस ठाण्यात झाली. उपअधीक्षक क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सकाळ'चे बातमीदार प्रकाश तिराळे यांना बातमी दिल्याच्या गैरसमजातून मुरगूड येथील मेंडके यांच्या बेकरीच्या समोर गुरुवारी (ता. ९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही मारहाण झाली. 

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 'तिराळे हे कार्यालयीन कामानिमित्त जाताना जमादार हा समोरून आला. यावेळी जमादार याने तिराळे यांना बातमी प्रसिध्द करण्यावरून जाब विचारत मारहाण केली. काही वेळातच आसिफखान जमादार व संदीप सणगर हे दोघे तेथे आले आणि त्यांनीही तिराळे यांना शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनी तिराळे यांची सुटका केली. 

तिराळे यांनी तिघांकडून मी व माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्यामुळे पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली.' दरम्यान, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिस ठाण्याच्या बाहेर जमाव करून दडपशाही करण्याचाही प्रयत्न झाला. अखेर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शन घेऊन रात्री दीडच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, पत्रकारांनी तिराळे यांच्याबाजूने उभे राहून त्यांना पाठिंबा दिला. 

तीन वर्षे शिक्षेची तरतूद 

'पोलिसांनी महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ च्या कलम चारनुसार गुन्हा दाखल केला. या कलमानुसार तीन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. याचा तपास उपअधीक्षकांकडून होतो', अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिली. याचवेळी भारतीय दंड संहिता १८६० कलम ३२३, ५०४, ५०६, ४२७ आणि ३४ नुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याही माहिती त्यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.