Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

किडनीमध्ये सूज असेल तर ' ही ' दिसू लागतात लक्षणं, वेळीच सावध व्हा नाही तर......

किडनीमध्ये सूज असेल तर ' ही ' दिसू लागतात लक्षणं, वेळीच सावध व्हा नाही तर......


किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनीमध्ये जराही समस्या झाली तर अनेक गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. किडनी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करतात आणि आपल्याला निरोगी ठेवण्याचं काम करतात.


पण आजकाल चुकीच्या खाण्या - पिण्यामुळे किंवा चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडनीच्या समस्य वाढत आहेत. यामुळे जेव्हा आपल्या किडनी योग्यपणे काम करू शकत नाही तेव्हा शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात. तेव्हा शरीर काही संकेत देऊ लागतं. अशात आज आपण जाणून घेऊ किडनी खराब होत असल्याची काही लक्षणं....

1) सकाळी थंडी वाजणे

सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला तुमचं शरीर नेहमीपेक्षा जास्त थंड वाटत असेल तर हे किडनी डॅमेजचं लक्षण असू शकतं. हे कोणत्याही सीझनमध्ये जाणवू शकतं. मग तो हिवाळा असो वा उन्हाळा. अशात तुम्हाला जर ही समस्या जास्त काळ जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा आणि आपल्या किडनीची टेस्ट करा.

2) लघवीतून फेस

सामान्यपणे लघवीतून फेस येत नाही किंवा लघवीचा रंगही हलका पिवळा असतो. पण जर तुमच्या लघवीमध्ये फेस तयार होत असेल तर हा लघवीमध्ये प्रोटीनचा संकेत असतो. असं तेव्हा होतं जेव्हा किडनी योग्यपणे पोषक तत्वांना फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.

3) लघवी अडकत अडकत येणे

लघवीच्या माध्यमातूनच किडनीसंबंधी वेगवेगळ्या समस्या जाणून घेता येऊ शकतात. तुम्हाला जर किडनी डॅमेजची समस्या असल्यास एकतर लघवी फार कमी येते किंवा पुन्हा पुन्हा लागते. कधी कधी लघवी थोडी थोडी येते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार घ्या.

4) शरीरात सूज

अनेकदा आपले पाय किंवा शरीराचा एखादा अवयव सूजल्यासारखा जाणवतो ज्याकडे आपण सहजपणे दुर्लक्ष करू शकतो. पण हा किडनी डॅमेजचा संकेत असू शकतो. कारण तुमचं शरीर किडनी डॅमेजची समस्या शरीरातील सूजेच्या माध्यमातून दाखवतं. त्यामुळे वेळीच डॉक्टरांना भेटा आणि योग्य त्या टेस्ट करा.

5) शरीरावर खाज

तुमच्या शरीरावर जर तुम्हाला विनाकारण खाज जाणवत असेल तर हा किडनी डॅमेजचा संकेत असू शकतो. हा संकेत मुख्यपणे किडनी स्टोन किंवा शरीराशी संबंधित एखाद्या दुसऱ्या आजाराचा संकेत असू शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.