Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यावर फौजदारी दाखल करा सुजित काटे; टक्केवारीसाठी काम बंद पडल्याचा आरोप ; आर्थिक व मानसिक छळ

माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यावर फौजदारी दाखल करा सुजित काटे; टक्केवारीसाठी काम बंद पडल्याचा आरोप ; आर्थिक व मानसिक छळ


सांगली : टक्केवारी न दिल्याच्या रागातून माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आपला मानसिक छळ सुरू केला आहे. सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी बेकायदेशीरपणे कुलूप ठोकले आहे. काम बंद पाडले आहे. यामुळे आपले प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून महापालिका प्रशासनाने सूर्यवंशी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकारनी फौजदारी दाखल करावी अन्यथा मला अत्म्याहत्या करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महापालिका मक्तेदार संघटनेचे अध्यक्ष सुजित काटे यांनी जिल्हापोलिस प्रमुख संदीप घुगे व महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
       

याबाबत बोलतांना काटे म्हणाले, माजी महापौर असलेल्या सूर्यवंशी यांच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये आरोग्य वर्धिनी केंद्राचे बांधकाम सुरू आहे. एकूण २१ लाख रुपयांचे हे काम आहे.महापालिकेच्या रीतसर निविदा प्रक्रियेतून काम मिळाले आहे. पण काम सुरू केल्यापासून माजी महापौर सातत्याने या कामांमध्ये खोडा घालत आहेत. महिन्याभरापूर्वी त्यांनी काम निकृष्ठ असल्याचा आरोप करत आपल्याकडे १० टक्के टक्केवारीची मागणी केली. त्यास नकार दिल्याने त्यांनी दोन वेळा आयुक्त, आरोग्यधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली. प्रथम शहर अभियंता, नगर अभियंता यांनी पाहणी केली. त्यानंतर उपायुक्तांनीही कामाची पाहणी केली. यामध्ये कुठेही काम निकृष्ठ झाल्याचे आढळून आले नाही. तरीही सूर्यवंशी सातत्याने टक्केवारीची मागणी करत आहेत. टक्केवारी न दिल्याने पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी कामाच्या ठिकाणी आमचे कुलूप तोडत स्वतःकडील कुलूप लावले. 

यामुळे काम बंद आहे. कामाच्या ठिकाणी १० लाख रुपयांचे बांधकाम साहित्य आहे. हे साहित्य आता ते साहित्य तिथे आहे का  याबाबत शंका आहे. शिवाय काम बंद असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय मानसिक त्रासही होत आहे.याबाबत आपण जिल्हापोलिस प्रमुख, मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. आयुक्त गुप्ता यांनी या कामाची पाहणी करावी. कुलूप काढताना रीतसर पंचनामा करावा. बांधकाम साहित्य आहे का याची खात्री करावी. बेकायदेशीर पणे कुलूप ठोकणाऱ्या सूर्यवंशी यांच्यावर फौजदारी दाखल करावी. अन्यथा आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केल्याचे काटे यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.