Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बायकोच्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू, चेंबूरमधील घटना

बायकोच्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू, चेंबूरमधील घटना 


नवरा बायकोत नेहमीच भांडण होत असतं. त्यात नवीन काही नाही. परंतु कधी कधी हे भांडण अगदी शेवटच्या टोकाला देखील जावू शकतं. अशीच एक घटना मुंबईतील चेंबूरमधून समोर आली आहे. येथे एका जोडप्याच्या भांडणात नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. बायकोच्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूरच्या माहुलमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असं की, धनजी मकवाना आणि जया नावाचं जोडपं चेंबूरच्या माहुलमध्ये आपल्या दोन मुलांसोबत राहत होतं. धनजी मकवाना उदरनिर्वाहासाठी मुंबई महानगर पालिकेत सफाई  कामगार म्हणून काम करत होते. परंतु त्यांना दारूचं व्यसन होतं. त्यामुळे नवरा बायकोत नेहमीच भांडण व्हायचं. मकवाना दारू प्यायचे म्हणून नवरा बायकोमध्ये नेहमी वाद होत होता धनजी आणि जयामध्ये २४ मे रोजी देखील दारूवरून जोरदार भांडण  झालं. शाब्दिक वाद थेट हाणामारीपर्यंत गेला. तेव्हा वैतागलेल्या जयाने धनजी यांच्या पोटात जारोत लाथ मारली. यात धनजी गंभीर जखमी झाले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. मद्यधुंद अवस्थेत घरी आल्यावर बीएमसीच्या कर्मचारी धनजीला बायकोने मारहाण केली. २४ मे रोजी बीएमसीच्या स्वच्छता विभागात काम करणाऱ्या बेशुद्ध धनजीला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं  होतं. परंतु तेथे उपचारादरम्यान धनजीचा मृत्यू झाला आहे.

आता धनजीची पत्नी जयावर बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे. आरसीएफ पोलिसांनी मृत धनजीची पत्नी जया मकवाना हिच्यावर आयपीसी कलम ३०४ अन्वये हत्येचा गुन्हा  दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहे. दारूवरून भांडण झाल्यामुळे बायकोच्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.