Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शुगर असणाऱ्यांना एवढी चवदार भाजीच खावा :, जाणून घ्या

शुगर असणाऱ्यांना एवढी चवदार भाजीच खावा :, जाणून घ्या 


मटण आणि मासे म्हणजे मांसाहारप्रेमींचा जीव की प्राण असतात, तर बहुतेक शाकाहारप्रेमींना पनीरचे पदार्थ प्रचंड आवडतात. परंतु मटण, मासे आणि पनीरपेक्षाही काही भाज्या स्वादिष्ट लागतात. कमळची भाजीही त्यापैकीच एक. होय, कमळ फुलाचीच भाजी. तुम्ही कधी खाल्ली नसावी, पण ही भाजी चवीला भारी लागतेच, शिवाय आरोग्यासाठीही उत्तम असते.

खरंतर कमळ दिसायला जितकं सुंदर दिसतं, त्याहून कितीतरी पटीने जास्त टेस्टी त्याची भाजी असते. परंतु कमळाच्या पाकळ्यांपासून ही भाजी बनवली जात नाही. तर कमळाच्या देठांची भाजी बनवतात. आयुर्वेदिक डॉ. प्रियंका सिंह सांगतात की, ही भाजी औषधी गुणांनी परिपूर्ण असते.
कमळाच्या देठात आयर्न, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरभरून असतं. त्यामुळे या देठांची भाजी डोळे, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. शिवाय यात भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि फायबर असतं. ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं, बद्धकोष्ठता दूर होते. शिवाय डायबिटीजच्या रुग्णांसाठीदेखील ही भाजी उपयुक्त असते.

सलाडमध्ये कमळाच्या देठांचा वापर केल्यास स्थूलपणा कमी होण्यास मदत मिळते. कोणाला जुलाब झाले असतील, तर त्यावरही आराम मिळतो. इतकंच नाही, तर ताप आला असल्यास कमळाच्या देठांचा सूप बनवून पिण्याचा सल्ला दिला जातो. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सही भरपूर प्रमाणात असतं.
परंतु लक्षात घ्या, कमळाच्या देठाची भाजी कितीही स्वादिष्ट आणि फायदेशीर असली, तरी ती स्वच्छ धुवूनच बनवावी. कारण या देठांमध्ये बॅक्टेरिया ग्रोथ प्रचंड असते. जर हे बॅक्टेरिया म्हणजेच जंतू पोटात गेले तर पोटदुखी होईलच परंतु संपूर्ण आरोग्यही बिघडू शकतं. त्यामुळे काळजी घ्यावी.

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित असली, तरी कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी ' सांगली दर्पण 'जबाबदार नसेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.