Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विश्वजीत कदम 'हे ' पाटलांच्या मागे उभे, पण कुठल्या पाटालांच्या?

विश्वजीत कदम 'हे ' पाटलांच्या मागे उभे, पण कुठल्या पाटालांच्या?


पुणे : विश्वास पाटील  फक्त पाटीलच नव्हे तर साहित्यिक पाटील आहेत, कदमांचे आणि पाटलांचे चांगलं नातं आहे आणि कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत, पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे फक्त 4 जूनला कळेल असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम  यांनी केलं आहे. नुकत्याच झालेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत तीन पाटील उमेदवार असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वजीत कदम यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. 



पुण्यातील भारती विद्यापीठाच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असलेल्या जेष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील यांच्या समोर विश्वजित कदमांनी हे वक्तव्य केलं. त्या आधी बोलताना विश्वास पाटील म्हणाले होते की, मी फक्त पाटीलच नाही तर साहित्यिक पाटील आहे. त्यावर बोलताना विश्वजीत कदज म्हणाले की, कदम आणि पाटलांचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. पाटलांच्या मागे कदम नेहमीच उभे आहेत, पण कुठल्या पाटलांच्या मागे उभे आहेत हे 4 जून रोजी समजेल.  विश्वजीत कदम यांच्या वक्तव्यावर पानिपतकार विश्वास पाटील यांनी 'बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे' असे म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला.

विशाल पाटील यांना काँग्रेसची छुपी मदत? 

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून सर्वाधिक चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे आग्रही होती. पण सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर विशाल पाटलांनी या ठिकाणी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली. 7 मे रोजी सांगती लोकसभेसाठी मतदान पार पडलं. 

सांगलीच्या जागेसाठी भाजपचे संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्येच खरी लढाई असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे नेते, विशेषतः काँग्रेसचे नेते जरी शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांच्या स्टेजवर दिसत असले तरी त्यांनी विशाल पाटलांच्या मागे आपली ताकद लावल्याची, त्यांना छुपी मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विशाल पाटील यांचं पारडं जड असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. 

विश्वजीत कदमांचे विशाल पाटलांना मदत केल्याचे संकेत

काँग्रेसचे आमदार विशाल पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे. विश्वजीत कदम हे नेमक्या कोणत्या पाटलाच्या मागे उभे राहिले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुणाचा प्रचार केला हे 4 जून रोजी समजेल हे नक्की.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.