Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खळबळजनक! लाच देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून लष्कारातील जवानाच्या वडिलांची गांधीगिरी

खळबळजनक! लाच देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून लष्कारातील जवानाच्या वडिलांची गांधीगिरी 


नांदगाव : लष्करातील जवानाकडून बाभूळवाडी येथील ग्रामसेविकेने उघडपणे लाच मागितली. लाच देण्यासाठी पैसे नाही म्हणून अंगावरचे कपडे बीडीओ विस्तार अधिकाऱ्यांच्या टेबलावर काढत, आज तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाच्या आवारात गांधीगिरी करण्यात आली.
तालुका पंचायत समितीच्या कार्यालयात अर्धनग्न आंदोलन सुरु होते. त्याचे विशाल वडघुले यांनी फेसबुकवरून थेट प्रक्षेपण सुरु केले. मात्र पंचायत समिती कुठलीही दाद लागू देत नसल्याचे बघून तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या कार्यालयाबाहेर हेच आंदोलन पुढे सुरु ठेवण्यात आले. 

आंदोलन बघताच तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी प्रभारी गटविकास अधिकाऱ्याकडे चौकशी करीत प्रकरण समजावून घेत तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले व तासाभरात लष्करातील या जवानाला दाखला मिळाला. 
तुमच्याकडे सरकारी कामासाठी पॆसे मागणार असेल, तर लाचलुचपत विभागाला कळवा, हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याची ग्वाही सैंदाणे यांनी दिल्याने आम्ही आंदोलन मागे घेतल्याची माहिती आंदोलनकर्ते विशाल वडघुले यांनी दिली. लाच देण्यासाठी पॆसे नाहीत म्हणून अंगावरचे कपडे काढून अर्धनग्न आंदोलन करण्यात आल्याने खळबळ उडाली. तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या हस्तक्षेपानंतर तासाभरात पंचायत समितीच्या वतीने लष्करातील या जवानाला दाखला देण्यात आल्यानंतर हे अर्धनग्न आंदोलन मागे घेण्यात आले. 

दरम्यान आजच्या या आंदोलनामुळे तालुका पंचायत समितीच्या प्रशासनाकडून होणारे कालहरण, दप्तर दिरंगाई यावर मात्र शिक्कमोर्तब झाले. बाभूळवाडी येथील विकास देवरे हे लष्करात सेवेत असून तेथील कार्यालयाच्या सूचनेनुसार त्यांना आपल्या विवाहसंबंधीचे प्रमाणपत्र व त्यावरील ग्राम पंचायतीची नोंद हवी होती.

एक महिन्याच्या रजेवर आलेल्या विकास देवरे यांची रजा संपत आल्याने त्यांनी गावाच्या ग्रामसेविकेकडे अर्ज केला. मात्र निवडणूक व अन्य कामांमुळे तसेच मागणी करणाऱ्या अर्जदाराकडे ग्राम पंचायतीची थकबाकी असल्याचे कारण सांगत ग्रामसेविकेने विवाहनोंदणी प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या दाखले देण्यासाठी टाळाटाळ केली.
असा आरोप लष्करातील जवान विकास त्यांचे वडील अण्णा देवरे यांनी केला व त्यांनी ही बाब आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडघुले यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर वडघुले यांनी ग्रामसेविकेला विचारणा केली असता, तुमचा काय संबंध, असे म्हणत ग्रामसेविकेने आपल्याला दुरुत्तरे दिली, अशी माहिती वडघुले यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.