Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्हीहीं पायात काळा दोरा बांधताय? दोऱ्याबाबत महिलांना 'या'गोष्टी माहिती असणे फार गरजेचे आहे

तुम्हीहीं पायात काळा दोरा बांधताय? दोऱ्याबाबत महिलांना 'या'गोष्टी माहिती असणे फार गरजेचे आहे 


नकारात्मक शक्ती किंवा एखाद्या व्यक्तीची आपल्याला नजर लागू नये यासाठी अनेक व्यक्ती पायात काळा धागा बांधतात. काही व्यक्ती याला अंधश्रद्धा मानतात तर काही जण यावर विश्वास ठेवतात आणि सर्व नियम आणि अटी पाळतात.

व्यवसायात, नात्यात अडथळे, आरोग्याच्या समस्या अशा विविध समस्यांनी त्रस्त व्यक्ती अशा पध्तीने पायात, हातात किंवा गळ्यात काळा धागा बांधतात. काळा धागा बांधण्यासाठी पूर्वीच्या काळातील व्यक्ती सक्ती करायचे. मात्र आता अशी सक्ती कोणीही करत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जग फार पुढे गेलं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीनुसार विविध गोष्टी पाळतात. अशात पायात काळा धागा बांधणे ही काळानुसार एक फॅशन झाली आहे. अनेक मुली पायात अँकलेट घालतात.

अँकलेट एकाच पायात घातलं जातं. काही मुली काळ्या धागात बांधलेलं आणि काळे मनी असलेलं अँकलेट सुद्धा घालतात. मात्र तुम्हाला माहितीये का? ज्योतिषशास्त्रानुसार, पायात अँकलेट घालण्याचे म्हणजेच काळा धागा बांधण्याचे काही नियम आहेत. हे नियम पुरुषांसाठी वेगळे आणि महिलांसाठी वेगळे आहेत.

महिलांसाठी नियम

नकारास्मकता दूर करून सकारात्मकतेचा स्विकार करताना अनेक महिला पायात काळा दोरा बांधतात. महिलांनी शक्यतो डाब्या पायातच काळा दोरा बांधावा. काळा दोरा बांधताना कोणत्याही दिवशी तो बांधू नये. शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर पायात काळा दोरा परिधान करावा. ज्या महिला किंवा स्त्रीया फॅशन म्हणून काळा दोरा बांधतात त्यांनी तसे करू नये.

पुरुषांसाठीचे नियम
ज्योतिषशास्त्रात पुरुषांसाठी देखील काळा दोरा बांधण्याचे काही नियम आहेत. काही मुलं गळ्यात काळा दोरा घालतात. मात्र तसे करणे चूक असून काळा दोरा कायम पायात बांधावा. ज्योतिषशास्त्रानुसार मुलांना कायम उजव्या पायात गाळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो. मुलांनी शनी ग्रहाच्या शांतीसाठी शनिवारी नाही तर मंगळवारी पायात काळा दोरा बांधावा.

काळा दोरा बांधण्याचे फायदे

ज्योतिषशास्त्रानुसार काळा दोरा बांधण्याचे अनेक फायदे आहेत. काळा दोरा बांधल्याने आपल्या आजुबाजूच्या सर्व नकारात्मक शक्तीपासून आपलं रक्षण होतं. तसेच काळा दोरा पायात बांधल्याने त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होते.
टीप : दिलेली माहिती खरी आहे असा दावा 'सांगली दर्पण 'करत नाही. तसेच या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळेल असा दावा सुद्धा 'सांगली दर्पण' करत नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.