Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चक्क एका बड्या कॉन्ट्रॅक्टरने दिली अभियांत्याला इनोव्हा कार भेट

चक्क एका बड्या कॉन्ट्रॅक्टरने दिली अभियांत्याला  इनोव्हा कार भेट 


अमरावती : अमरावतीमध्ये सध्या अभियंता आणि ठेकेदारांची चांगलीच चलती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अमरावती जिल्हा परिषद बांधकाम विभागातील एका अभियंताला एका मोठ्या कंत्राटदाराकडून नवीन कोरी इनोव्हा कार भेट देण्यासाठी अमरावतीमधील शोरुममध्ये इनोव्हा कार बुक केली गेली असल्याचे समोर आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर गेल्याने सर्वत्र प्रशासक राज सुरू आहे. जिल्हा परिषद देखील याला अपवाद नाही. जिल्हा परिषदेत जरी प्रशासक राज सुरू असले तरी येथे नेहमीच अधिकार्‍यांचे राज्य असते. मुख्य कार्यकारी अधिकारी या पदापेक्षाही जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पद फार मोठे असल्याचे मानले जाते. येथे कुठल्याही कामाचे टेंडर मॅनेज केल्यापासून तर अनेक भ्रष्टाचारी कार्य हाती घेतल्या जाते. बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, टेंडर क्लार्क व ठेकेदार यांच्या संगणमताने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड उघड होत असतो. 

सर्व कायदे, नियम धाब्यावर बसून टेंडर मॅनेज केल्या जातात. कुठल्या ठेकेदाराला ठेका मिळेल हे आधिच फिक्स झालेले असतात. असाच प्रकार धामणगाव येथील एक मोठा ठेकेदार येथे येऊन गब्बर झालेला आहे आणि या ठेकेदाराने अधिकार्‍यांना आपल्या खिशात ठेवण्यासाठी नवीन नवीन शक्कल लढवली आहे. जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या उघड चर्चा नुसार या अभियंताला खुश करण्यासाठी नवी कोरी इनोव्हा कार भेट देण्यासाठी शहरातील एका बड्या शोरुममध्ये ही गाडी बुक करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल शाळेच्या मैदानात सुरू आहे. जवळपास 56 कोटीचा हा ठेका असल्याचे सांगण्यात येते. हा ठेका एका विशिष्ट ठेकेदाराला देण्यासाठी टेंडर मॅनेज करण्यात आले. टेंडरची देणगी मिळाल्यामुळे हा संबंधित ठेकेदार एवढा खुश आहे की त्याने आपल्या साहेबाला खुश करण्यासाठी थेट नवीन कोरी इनोव्हा कार बुक करण्यात आली. ही भेट पूर्णतः निःशुल्क असल्याचे सांगण्यात येत आहे.
या नव्या कोर्‍या इनोव्हाची चावी सोपवण्याआधी आरटीओचे सारे सोपस्कार पार पाडून चाबी देणार असल्याचे जि.प.तील खास सुत्राने सांगितले आहे. जिल्हा परिषदेत अधिकारी व ठेकेदारांमध्ये यातून एक मोठा संघर्ष होण्याची नांदी स्पष्ट झाली आहे. अभियंता किंवा कुठल्याही जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍याला अशा प्रकारची लालूच देऊन ठेकेदाराने आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतलेली आहे. कुठलेही टेंडर मॅनेज करण्यासाठी आता भ्रष्टाचाराची रक्कम किंवा कमिशन देण्याची गरज राहिलेली नाही. भेटवस्तू म्हणून अधिकार्‍यांना अशी मेजवानी देण्याची एक नवीन प्रथाच पडणार आहे. इनोव्हा कार किंवा सोन्याचे दागिने एखादा भूखंड, परदेश वारीची ट्रीप, विदेशातील मौजमजा अशा प्रकारच्या नव्या पॅकेज भ्रष्टाचारामध्ये निर्माण झाल्यास नवल वाटू नये. कामाचे टेंडर मॅनेज करताना ठेकेदाराला एक चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.