Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

" दिल्लतील मतदार हातात झाडू घेऊन सुकलेल्या कमळचा कचरा साफ केल्याशिवाय राहणार नाहीत "

" दिल्लतील मतदार हातात झाडू घेऊन सुकलेल्या कमळचा कचरा साफ केल्याशिवाय राहणार नाहीत "


दिल्लीतील कथित मद्द धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत अंंतरिम जामीन मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावा, अशी मागमी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी पार पडली. त्यानंतर कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज निकाल घोषीत केलाय.

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोषात घोषणाबाजी केली आहे. तर महाराष्ट्रात देखील आपच्या नेत्यांनी मोठा आंनद साजरा केलाय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन हा केंद्र सरकारच्या दडपशाहीला मिळालेली सणसणीत चपराक आहे. सत्तेच्या बळावर सरकारने इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी न्यायालय तो आवाज दाबू देणार नाही. या निर्णयाबद्दल न्यायालयाचे आभार! आता दिल्लीतील मतदार हातात झाडू घेऊन सुकलेल्या कमळाचा कचरा साफ केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.