Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगाचा अंत जवळच! या तीन विचित्र घटना देतायत संकेत? धक्कादायक दावा समोर

जगाचा अंत जवळच! या तीन विचित्र घटना देतायत संकेत? धक्कादायक दावा समोर 


इस्रायलमध्ये घडलेल्या तीन घटनांनंतर आता कॉन्सपिरसी थियरिस्ट्स सक्रीय झाले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की या घटना जगाच्या अंताचा संदेश देऊ शकतात. मानवजातीसाठी हे अत्यंत वाईट असून कॉन्सपिरसी थियरिस्ट्सचे हे दावे अत्यंत धक्कादायक आहेत. लोकांना या घटनांबद्दल कळलं असता त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता.

'डेलीस्टार' च्या वृत्तानुसार या विचित्र घटनांची सुरुवात इस्रायलमध्ये 2000 वर्षांतील पहिल्या लाल बछड्याच्या जन्मापासून सुरु झाली. ख्रिश्चन आणि यहूदी धर्मात लाल बछड्याचा 'काळाच्या अंताशी' संबंध आहे. द टेंपल इन्स्टिट्यूटने युट्यूबवरुन लाल बछड्याच्या जन्माची माहिती दिली. त्यानंतर अजून एक विचित्र घटना घडली.


मृत समुद्र किंवा डेड सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्रात सर्वाधिक खारं पाणी असूनही त्यात मासे आणि वनस्पती आढळून आल्याचा दावा समोर आला आहे. हे मासे दिसल्याबाबत माहिती सर्वप्रथम एका फोटो जर्नालिस्टने दिली होती. तिसरी विचित्र गोष्ट म्हणजे इस्त्रायलच्या पश्चिम भिंतीवरून एक साप सरपटत बाहेर पडला. तिथे प्रार्थना करणारे लोक त्यामुळे आश्चर्यचकित झाले आहेत. हे सर्वनाशाचे संकेत आहेत. 'टाइम्स ऑफ इस्त्रायल' ने काही वर्षांपूर्वी पश्चिम भिंतीवरून एक साप सरपटत आल्याची माहिती दिली होती.
कॉन्सपिरसी थियरिस्ट्सच्या मते या तीन घटना म्हणजे जगाचा अंत जवळ आल्याचे संकेत आहेत. 2000 वर्षांतील पहिल्या लाल बछड्याचा जन्म मानवतेसाठी एक वाईट संकेत असू शकतो. 'मिरर' च्या रिपोर्टनुसार मसिहा येणार ही भविष्यवाणी खरी असल्याचे हे संकेत आहेत. बहुचर्चित लाल बछड्याचा जन्म 2018 मध्ये झाला. त्यानंतर आपले दिवस आता मोजकेच उरल्याची भिती निर्माण झाली. यहुदी धर्मात लाल बछड्याचा जन्म आणि बलिदान हे जेरुसलेममधील तिसऱ्या मंदिराआधीची घटना मानली जाते. रुढीवादी यहूदी धर्मात मंदिराची पुनर्निर्मिती ही मसीहा येण्यापूर्वीची घटना मानली जाते.

फोटो जर्नलिस्ट नोम बेदीन याने मृत समुद्रातील मासे आणि वनस्पती पाहून 'भविष्यवाणी' खरी ठरत असल्याचं म्हटलं आहे. बेदीनचा दावा आहे की 'भविष्यवेत्ता ईजेकील याने त्याच्या अखेरच्या भविष्यवाणीमध्ये मृत समुद्र जिवंत होताना पाहिला. 47:8-9 नुसार बायबलच्या काळात शापित असलेल्या एका जागेवर आता तुम्ही येऊ शकता. सिंकहोल्सचा शोध घेऊ शकता आणि पाणी कमी असलेल्या ठिकाणी मासेही दिसत आहेत. हे सगळं म्हणजे जगाचा अंत जवळ आल्याची लक्षणं आहेत.'

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.