Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत योगी आदित्यनाथ, संजय राऊत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी

सांगलीत योगी आदित्यनाथ, संजय राऊत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी


सांगली :  सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या हेलिकॉप्टरची महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने तपासणी केली. या तपासणीनंतर राऊत यांनी प्रशासनावर टीका केली.  


बुधवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगलीतील महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार सभेसाठी सांगलीत आले होते. कवलापूर येथील विमानतळावरील हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरले होते. आदित्यनाथ सभेसाठी गेल्यानंतर महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. शिवाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचेही हेलिकॉप्टर बुधवारी कवलापूर येथील हेलिपॅडवर उतरवण्यात आले होते. 

सांगलीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा धुमाळ यांच्या सूचनेनुसार या दोघांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये आक्षेपार्ह काहीही आढळले नसल्याचे सांगण्यात आले.  तपासणी केलेल्या पथकामध्ये पथक प्रमुख नवनाथ कोळी, सचिन कनप, कुलदीप माने, शंकर मदने आदींचा समावेश होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.