Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रोटावेटर मध्ये अडकून तरुणाचा दुर्देवी मृत्यू

रोटावेटर मध्ये अडकून तरुणाचा दुर्देवी मृत्यू 


यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात शेतात रोटावेटर करीत असताना ड्रायव्हरच्या मागच्या साईडला तोल जाऊन रोट्याव्हेटर मध्ये अटकून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन दुदैवी मृत्यु झाल्याची घटना दुपारीच्या सुमारास घडली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, डांभुर्णी तालुका यावल येथील राहणारा विजय जानकीराम कोळी बाविस्कर (वय ३५) हा रोटावेटर करण्यासाठी शेतात गेलेला असता १४ मे २०२४ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मागील बाजूस रोटावेटर मध्ये अटकून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. याबाबत केतन रेवा पालक यांनी दिलेल्या खबर वरून यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल वासुदेव मराठे हे करीत आहेत

सदर मयताचे मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अत्यंत शोकाकुल परिस्थितीमध्ये डांभुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. मयत विजय कोळी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.