Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवृत्त आयएएस अधिकाऱ्यावर ' ईडी ' ची कारवाई

निवृत्त आयएएस अधिकाऱ्यावर ' ईडी ' ची कारवाई 


मुंबई : मनी लाँड्रिंग आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात निवृत्त आयएएस अधिकारी रमेश अभिषेक यांच्याशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छापा टाकला. 'सीबीआय'ने मनी लाँड्रिंग प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर 'ईडी'ने कारवाई सुरू केली आहे.

रमेश अभिषेक हे १९८२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते २०१९ मध्ये उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. तत्पूर्वी ते फॉरवर्ड मार्केट कमिशनचे (एफएमसी) अध्यक्षही होते. या प्रकरणात 'सीबीआय'नेही फेब्रुवारी महिन्यात छापे टाकले होते. 'सीबीआय'ने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, अभिषेक यांनी सरकारी नोकरीवर असताना ज्या खासगी कंपन्यांना बेकायदेशीरपणे फायदा मिळवून दिला त्यांच्याकडून आपल्या निवृत्तीनंतर कन्सल्टन्सी फी म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप आहे. 'सीबीआय' आणि 'ईडी'ने त्यांची मुलगी वनिसावरही गुन्हा दाखल केला आहे.

काम न करता घेतली फी
यापूर्वी लोकपालने रमेश अभिषेक यांच्या भ्रष्टाचाराची दखल घेतली होती. रमेश अभिषेक यांना ऑगस्ट २०२१ ते मे २०२३ दरम्यान कोट्यवधी रुपये मिळाले. अभिषेक हे सरकारी अधिकारी असताना त्यांचे वार्षिक उत्पन्न ३४ लाख रुपये होते. त्यांनी निवृत्तीनंतर कन्सल्टन्सी फी घेतली मात्र कंपन्यांचे काम केले नाही, असे लोकपालने यापूर्वी म्हटले आहे. याच पैशातून त्यांनी नवी दिल्लीतील ग्रेटर कैलास २ येथे घरासाठी गुंतवणूक केल्याच्या संशयातून छापेमारी केली असून नवी दिल्लीसह विविध ठिकाणांची माहिती घेण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.