Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल ' पुणे अपघातानंतर मस्तवाल रॅप, व्हिडिओ

' फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल ' पुणे अपघातानंतर मस्तवाल रॅप, व्हिडिओ 


पुणे पोर्श अपघात प्रकरणानंतर एका रॅप सॉन्गचा झाला. हे रॅप सॉन्ग करणारा अपघात करणारा अल्पवयीन मुलगा असल्याचं बोललं गेलं, पण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा व्हिडिओ फेक असल्याचं सांगितलं आहे. जामीन मिळाल्यानंतर या अल्पवयीन मुलाने एक रॅप सॉन्ग तयार केल्याचं बोललं गेलं होतं. या व्हिडिओमध्ये रॅप सॉन्ग करणारा मुलगा आपण पुन्हा रस्त्यावर खेळ दाखवायची भाषा करत आहे. तसंच त्याने रॅपमधून लोकांनाही शिवीगाळ केली आहे आणि लोकांवर वाहन चढवण्याची भाषा केली आहे. ' सांगली दर्पण 'या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

पुण्याचे बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवत दोघांना चिरडलं, यामध्ये दोन्ही इंजिनिअरचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी मुलाला अल्पवयीन असल्यामुळे जामीन देण्यात आला, पण यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या आरोपीला अल्पवयीन न धरता प्रौढ म्हणून खटला चालवावा, कारण त्याचं वय 17 वर्ष 8 महिने आहे, तसंच त्याने केलेला गुन्हा गंभीर आहे, अशी मागणी पुणे पोलिसांनी कोर्टात केली. याप्रकरणी कोर्टाने आता अल्पवयीन मुलाची रवानगी 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात केली आहे. तर आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपीला सज्ञान ठरवण्यासाठी पोलिसांना एक महिन्यात दोषारोपपत्र द्याव लागणार आहे. त्यानंतर ससून रुग्णालयातील मानसोपचारतज्ञाकडे नेऊन त्यांचा रिपोर्ट आणि बालसुधारगृहातील प्रोबेशन ॲाफिसर यांचा अहवाल घेतला जाईल. तीन महिन्यांच्या कालावधीच्या आत बाल हक्क न्यायालय अल्पवयीन आरोपी सज्ञान आहे की नाही याबाबत निर्णय घेईल. या प्रक्रियेला तब्बल तीन महिन्याचा कालावधी बाल सुधार कायद्यात देण्यात आलेला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.