Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रोज एक वाटी मूग खाल्याने होतील 'हे ' फायदे

रोज एक वाटी मूग खाल्याने होतील  'हे ' फायदे 


सकाळच्या नाश्त्यात आपण जे काही खातो ते आपल्याला दिवसभराची ऊर्जा मिळण्यासाठी उपयोगी ठरते. रात्री एक वाटली हिरवे मूग भिजत घालून ते सकाळी खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. हिरवे मूग खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते आणि चयापचयची गती सुधारते. तसेच भिजवलेले मूग खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरल्या सारखे वाटते त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तर आणखी दररोज सकाळी एक वाटी भिजवलेले मूग खाण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

वजन नियंत्रित

शरीराचे वाढते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मूग हा उत्तम पर्याय आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर रिकाम्या पोटी मुगाचे सेवन करावे. मोड आलेले मूग प्रथिने आणि फायबरचा एक चांगला स्त्रोत मानला जातो आणि त्यात चरबीचे प्रमाण देखील कमी असते, जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.

अशक्तपणा सुधारतो
शरीरात रक्ताची कमतरता अनेक समस्या वाढवू शकते. अशा परिस्थितीत मूग डाळ फायदेशीर ठरू शकते. मूग डाळीमध्ये लोह असते, जे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. दररोज मूठभर मोड आलेले मूग खाल्ल्यास अशक्तपणा दूर होऊ शकतो.
स्नायूंना बळकटी देते

शरीराला बळकट करण्यासाठी मूग डाळीचे सेवनही करता येते. मोड आलेले मुगाचे सेवन स्नायूंसाठी उत्तम असते. मूग डाळीमध्ये भरपूर प्रथिने आढळतात, रोज मूग खाल्ल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होते.

डोळे निरोगी
अंकुरलेल्या मुगाचे नियमित रिकाम्या पोटी सेवन करणे डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. मूगमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जे दृष्टी तीक्ष्ण करण्यास मदत करते. यासोबतच डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित

रिकाम्या पोटी मूग खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप प्रभावी ठरते. मोड आलेल्या मुगाचा मधुमेहविरोधी प्रभाव असतो, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. यासाठी तज्ज्ञ मूठभर अंकुरलेली कडधान्ये खाण्याचा सल्ला देतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
मोड आलेले मूग नियमितपणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे अँटी-ऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मानला जातो. म्हणून, जर तुम्ही रिकाम्या पोटी मोड आलेले मूग सेवन केले तर ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. दररोज एक मूठभर खाल्ल्यास, आपण विषाणू आणि बॅक्टेरियाच्या संसर्गापासून सुरक्षित राहू शकता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.