Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या :, निवडणूक आयोगाचा निर्णय

Breaking News! राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या :, निवडणूक आयोगाचा निर्णय 


मुंबई:  राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १० जून रोजी या निवडणुका होणार होत्या. दोन शिक्षक आणि दोन पदवीधर जागांसाठी ही निवडणूक होणार होती. या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने अनिश्चित काळासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 


२ शिक्षक आणि २ पदवीधर जागेसाठी निवडणुका १० जून रोजी होतील असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं होतं. पण, काही शिक्षक, पदवीधर संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता. शाळांना सुट्टी असल्याने मतदानावर परिणाम होईल, असं शिक्षक संघटनांचे म्हणणे होते. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने शिक्षक, पदवीधर निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. निवडणुकांची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई, नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या, पण त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

१० जून रोजी मतदान आणि १३ जून रोजी मतमोजणी असं नियोजन होतं. पण, शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने याबाबत विचार करुन निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विलास पोतनीस (उद्धव ठाकरे गट), कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन डावखरे (भाजप), मुंबई शिक्षकचे कपिल पाटील, नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांच्या सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळे या चार रिक्त जागांसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.