Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गर्दीने भरलेल्या मुंबई लोकलमध्ये कपलचा रोमान्स:, व्हिडिओ व्हायरल

गर्दीने भरलेल्या मुंबई लोकलमध्ये कपलचा रोमान्स:, व्हिडिओ व्हायरल 


सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात सार्वजनिक वाहतूक अर्थात रेल्वे, मेट्रो, बसमधीलही अनेक व्हिडीओसचा समावेश असतो. यात भारतात अशा अनेक ट्रेन्स आहेत, ज्यात इतकी गर्दी असते की प्रवाशांना पाय ठेवायला जागा नसते.

यात मुंबई लोकल ट्रेनचे नाव सर्वात आघाडीवर आहे, मुंबई लोकलमध्ये रात्रंदिवस गर्दी पाहायला मिळते. विशेषत: वर्किंग दिवसांमध्ये तर पाय ठेवायला सोडा, श्वास घ्यायलापण जागा मिळत नाही. तरीही गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये कपल्स रोमान्स करणं काही सोडत नाहीत. सध्या सोशल मीडियावर मुंबई लोकलमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी एका तरुणाला मिठी मारून उभी आहे.

मुंबई लोकलमध्ये जोडप्याचा रोमान्स
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेनमध्ये इतकी गर्दी आहे की लोकांना पाय ठेवायला जागा नाही, पण यातही पुरुषांच्या डब्यात एक तरुण आणि तरुणी विचित्र पद्धतीने प्रवास करताना दिसत आहेत. हे दोघं एकमेकांना मिठी मारून ट्रेनच्या दरवाजाच्या साईडला उभे आहेत. ट्रेनमध्ये उभे असलेले इतर प्रवासी दोघांकडे पाहत नाहीत, पण ते आपल्या धुंदीत एकमेकांना मस्त मिठी मारून उभे आहेत. यावेळी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ शूट केला आहे. दरम्यान, पुरुषांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या या कपलमुळे मात्र इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @therealsrk_नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे; तर अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, प्रत्येक जण त्या तरुण आणि तरुणीकडे पहात आहे, परंतु त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, दिल्ली मेट्रोपेक्षा मुंबई लोकल ट्रेनमध्ये जास्त गर्दी असते, पण तरीही हे लोक असे व्हिडीओ रेकॉर्ड करत आहेत. आणखी एकाने, ट्रेनमध्ये आधीच खूप गर्दी आहे, श्वास घेणेही कठीण आहे, हे दोघे कसे आरामात उभे आहेत. गर्दीच्या ठिकाणी रील बनवणाऱ्या तरुण-तरुणींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान अनेकांनी कमेंटमध्ये कपलचा खुलेआम रोमान्स पाहून मुंबई लोकलला दिल्ली मेट्रो करु नका अशी विनंती केली आहे, कारण दिल्ली मेट्रोमधील अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.