Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कांदा भाजपाला रडवणार ? कांद्याने बटन दाबून वाजवली 'तुतारी ':, शेतकऱ्याचा VIDO व्हायरल

कांदा भाजपाला रडवणार ? कांद्याने बटन दाबून वाजवली 'तुतारी ':, शेतकऱ्याचा VIDO व्हायरल 


माढा - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत आज राज्यातील 11 मतदारसंघांत मतदान झाले. त्यात एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याची ही कृती केंद्राच्या कांदा निर्यात बंदीविरोधात असल्याचे मानले जात आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने काही महिन्यांपूर्वी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. पर्यायाने त्याचा फटका राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला.


शेतकऱ्यांनी केंद्राकडे अनेकदा आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. पण सरकारने निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेता त्याची मुदत वेळोवेळी वाढवली. यामुळे शेतकरी चांगलेच संतापले होते. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरकारने कांदा निर्यातबंदी मागे घेतली. या निर्णयाचा शेतकऱ्यांना काहीअंशी फायदा होण्याची शक्यता असली तरी, त्यांचा सरकारवरील रोष मात्र कमी झाला नाही. या व्हिडिओत हा शेतकरी ईव्हीएमवर कांदा ठेवतो आणि त्यानंतर एका विशिष्ट पक्षाचे बटन दाबतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.