Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

15 जूनपासून ' एक राज्य एक गणवेश ' वाचा काय नियम आहेत

15 जूनपासून ' एक राज्य एक गणवेश ' वाचा काय नियम आहेत 


राज्यातील शाळकरी मुलांसाठी महत्वाची बातमी आहे. 15 जूनपासून पहिली ते आठवीच्या मुलांसाठी 'एक राज्य एक गणवेश' योजना लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आता विद्यार्थ्यांना सोमवार, बुधवार व शुक्रवारी नियमित गणवेश परिधान करणे आवश्यक असणार आहे. तसेच स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवारी परिधान करावा लागणार आहे. हा गणवेश कसा असेल ते जाणून घेऊयात... 
राज्यातील शाळा 15 जून 2024 पासून सुरू होणार आहेत. त्यापूर्वीच सरकारने ही घोषणा केली आहे.स्थानिक महिला बचत गटामार्फत हे गणवेश तयार करण्याचे काम सुरू आहे. स्काऊट गाईडच्या गणवेश शिलाईसाठी 100 रुपये प्रति गणवेश व अनुषांगिक खर्च 10 असे एका गणवेशासाठी 110 रुपये लागतात. ही रक्कम प्राथमिक शिक्षण परिषद खर्च करणार आहे. विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी कसा गणवेश घालावा लागेल ते जाणून घेऊयात... 

1 ली ते 4 थी मुली 

नियमित आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक हा गणवेश सोमवार, बुधवार व शुक्रवारी परिधान करावा लागेल. तर गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक हा स्काऊट व गाईडचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवारी परिधान करावा लागेल. 

5 वीच्या मुलींसाठी असा असेल गणवेश
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट हा नियमित गणवेश सोमवार, बुधवार व शुक्रवारी परिधान करावा लागेल. तर स्काऊट व गाईडचा गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक हा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवारी परिधान करावा लागेल. 

6 वी ते 8 वी मुली आणि 1 ली ते 8 वी मुली (ऊर्दू माध्यम)

आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी हा नियमित गणवेश सोमवार, बुधवार व शुक्रवारी परिधान करावा लागेल. तर गडद आकाश निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार, गडद निळ्या रंगाची ओढणी हा स्काऊट व गाईडचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवारी परिधान करावा लागेल. 

8 वी मुले
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची फुल पॅन्ट हा नियमित गणवेश सोमवार, बुधवार व शुक्रवारी परिधान करावा लागेल, तर स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट हा स्काऊट व गाईडचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवारी परिधान करावा लागेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.