Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकिंग न्यूज! राज्यातील 1900 रुग्णालयात प्रत्येकालाच मिळणार 5 लाखापर्यंत मोफत उपचार

ब्रेकिंग न्यूज! राज्यातील 1900 रुग्णालयात प्रत्येकालाच मिळणार 5 लाखापर्यंत मोफत उपचार 


सरकार हे समाजातील प्रत्येक गटाचा विचार करून नवनवीन योजना आणत असतात. समाजातील गरीब आणि गरजू लोकांना आरोग्यसेवा चांगल्या मिळाव्यात आणि त्यांचे आरोग्य निरोगी राहावे. यासाठी सरकार वेगवेगळे प्रयत्न करत असतात यासाठी सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना आणली होती. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या धारकांना लाभ मिळत होता. परंतु आता सरकारने हा निर्णय बदलून समाजातील सगळ्या व्यक्तींना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच आता अंतोदय, पिवळे, केशरी रेशनकार्डसह शुभ्र रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत त्यांचा पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च दरवर्षी मोफत होणार आहे.

या योजनेमध्ये आता तीन कोटी लाभार्थ्यांची वाढ झालेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे एकूण लाभार्थ्यांना 9 कोटी 62 लाख 7 हजार 743 एवढे लाभार्थी झालेले आहेत. जनतेला घरपोच आरोग्य सेवा मिळाव्यात आणि त्यांचा आर्थिक भार कमी होण्यासाठी, सरकारने ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केलेली होती. गेल्या वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतील विमा संरक्षित रक्कम अडीच लाखांवरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नागरिकांना रेशन कार्ड अधिवास प्रमाणपत्र गरजेचे आहे. या योजनेमध्ये अनेक कर्करोग, हृदयरोग, शस्त्रक्रिया, सांधेदुखी आणि विविध आजारांचे निदान केले जाते. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आयुष्यमान गोल्डन कार्ड असणे गरजेचे आहे.
दरवर्षी करणार 3000 कोटी रुपयांचा खर्च

सरकारच्या या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आतापर्यंत दरवर्षी अडीच लाख रुपयांचा लाभ मिळत होता. परंतु आता सरकार विमा कंपनीला प्रतिकुटुंब 1300 रुपये प्रीमियम म्हणून देणार आहे. त्यासाठी सरकार दरवर्षी 3000 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

1900 रुग्णालयात मिळणार मोफत उपचार
राज्यातील 1900 रुग्णालयांमध्ये आता नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी रुग्णालयाच्या संलग्नित रुग्णालयात जावे लागेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.