मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. खुनाच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. हा कन्नड अभिनेता असून दर्शन थुगुदीपा असं अभिनेत्याचं नाव आहे. बंगळुरू पोलिसांनी कामाक्षीपाल्या येथून अभिनेत्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्या संपर्कात असलेल्या इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रेनुकास्वामी नावाच्या एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता दर्शन शूगुदीपा याला अटक केली आहे. रेनुकास्वामी नावाची व्यक्ती चित्रगुर्ग नावाच्या एका मेडिकल शॉपमध्ये अस्टिस्टंट होती. नुकतंच तिचं लग्न झालं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल शॉपमधून व्यक्तीचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर शहाराच्या कामाक्षीपाल्या येथे तिची हत्या करण्यात आली. हत्येनंतर तिच्या मृतदेहाची व्हिल्हेवाट लावण्यात आली. मृताच्या शरीरावर जखमांचे निशाण दिसून आलेत.पोलिस उपायुक्त एस गिरीश यांनी या घटनेची माहिती दिली आहे. परंतु घटनेचे डिटेल्स देण्यास त्यांनी नकार दिलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला त्याच्या मूळ गावी असलेल्या म्हैसूरमधील चामराजेंद्र प्राणी उद्यानाजवळील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.