Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छ. शिवाजी महाराजांचे गाणे वाजवल्याने अहिल्यादेवी होळकर जयंती मिरवणूकीवर तुफान दगड फेक

छ. शिवाजी महाराजांचे गाणे वाजवल्याने अहिल्यादेवी होळकर जयंती मिरवणूकीवर तुफान दगड फेक 


मरखेड तालुक्यातील मुळावा येथे शुक्रवार, 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांवरील 'फाडला शिवबाने अफझलखानाला फाडला' हे गाणे वाजवल्याने दगडफेक करण्यात आली.

ही मिरवणूक मुळावा येथील गांधी चौक, गणपती मंदिर, आप्पास्वामी मंदिर, बसस्थानकमार्गे रेणुकादेवी मंदिर मार्गाने जाऊन देवीवार्ड येथे समाप्त होणार होती. रात्री साडेआठच्या सुमारास मिरवणूक मुळावा येथील टिपू सुलतान चौक, जमजम किराणा दुकान येथे आली. तेव्हा डीजेवर 'वादग्रस्त' गाणे वाजत असताना काही तरुणांनी पथदिवे बंद करून मिरवणुकीवर तुफान दगडफेक केली.

अचानक दगडफेक होत असताना बघून मिरवणुकीत सहभागी असलेल्या तरुणांनीसुद्धा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीमध्ये 9 तरुणांसह काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस कर्मचारी देविदास आठवले, संदीप शेरे, हिंमत बंडगर, समाधान नरवाडे यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोफाळीच्या ठाणेदारांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदारांनी दोन्ही गटाला शांत केले. मुळाव्यातील दगडफेकीची वार्ता तालुक्यात वार्‍यासारखी पसरल्याने मुळावा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुळावा येथे पुसद, उमरखेड, पोफाळी येथील पोलिस पथकासह दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले.

घटनास्थळी यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उमरखेड उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी भेट दिली. या घटनेत 14 जणांविरोधात भादंवि 143, 147, 148, 149, 324, 353, 332, 506, 135 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोफाळीचे ठाणेदार पंकज दाभाडे करीत आहेत.

मुळावा येथील बाजारपेठ बंदमुळावा येथील संपूर्ण बाजारपेठ शनिवार, 1 जून रोजी बंद ठेवण्यात आली. तगडा पोलिस बंदोबस्त असल्याने मुळावा गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी घटनास्थळाला भेट देऊन संपूर्ण भागाची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधून घटनेचा तपास करून घटनेतील आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन गावातील नागरिकांनी मनात कुठलीही भीती न ठेवता शांततेचे आवाहन केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.