कथांमध्ये तुम्ही अनेकदा दडलेल्या खजिन्याबद्दल खूप ऐकलं असेल. प्रत्येकाला खजिना सापडतोच असं नाही, ही वेगळी गोष्ट आहे, पण काही ठिकाणं अशी आहेत जिथे खोदकाम केल्यावर काहीतरी मौल्यवान वस्तू सापडते.
विशेषत: जेव्हा हातात मेटल डिटेक्टर असेल तेव्हा हे काम सोपं होतं.
सध्या एक होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती जमीन खोदून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. यावेळी त्याला मातीत गाडलेलं काहीतरी सापडलं, जे त्याचं नशीब उजळण्यास पुरेसं होतं. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यास तुम्हीही म्हणाल, की हे माझ्या नशीबात असायला हवं होतं.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती खडकाखाली काहीतरी शोधत आहे. त्याच्या हातात मेटल डिटेक्टर देखील आहे, ज्याद्वारे त्याला तिथे काही मौल्यवान वस्तू शोधायची आहे. दरम्यान, त्याला एक जुनं भांडं सापडतं. ती व्यक्ती मडकं बाहेर काढते आणि त्यात काही आहे का हे तपासते. ते उघडताच आतून काही खूप जुन्या आणि पुरातत्वीयदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी बाहेर येतात. व्यक्ती ऐतिहासिक महत्त्वाच्या या गोष्टी एक-एक करून बाहेर काढतो, त्या खूप मोलाच्या आणि महागड्या असतील.अशा प्रकारे चालता-फिरता खजिना सापडल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर the_best_archaeologist नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी लाइक केला आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना काही लोकांनी म्हटलं की, त्याला खूप चांगली गोष्ट सापडली आहे, तर काही लोकांनी असाही संशय व्यक्त केला आहे की, त्यानेच ही घागर इथे ठेवली असावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.