Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इलेक्ट्रिक शॉक दिला, नाक अन् जीभ कापली... पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

इलेक्ट्रिक शॉक दिला, नाक अन् जीभ कापली... पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

कन्नड अभिनेता दर्शन सध्या देशभरात चर्चेत आला आहे. पोलिसांनी गेल्या आठवड्यात एका हत्येप्रकरणी त्याला अटक केली होती. दर्शनवर रेणुकास्वामी  नावाच्या व्यक्तीचा खुन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी दर्शनची मैत्रीण आणि कन्नड अभिनेत्री पवित्रा गौडा हिलाही अटक केली आहे. रेणुकास्वामी पवित्राला अश्लील मेसेज पाठवायचा, त्यामुळेच या दोघांनी मिळून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान, आता रेणुकास्वामीच्या पोस्टमॉर्टममधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इलेक्ट्रिक शॉक दिला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुकास्वामी सातत्याने पवित्राला मेसेज पाठवायचा. याचाच राग मनात धरुन दर्शनने मारेकऱ्यांना सुपारी देऊन त्याची हत्या केली. हत्येपूर्वी रेणुकास्वामीला इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला. याप्रकरणी केबल कामगार धनराज याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. धनराजने पोलिसांना सांगितले की, या प्रकरणातील आणखी एक आरोपी नंदिशने त्याला बंगळुरू येथील एका गोडाऊनमध्ये बोलावले आणि तिथे रेणुकास्वामीला शॉक देण्यासाठी एक खास उपकरण बनवायला लावले. पोलिसांनी हे उपकरणही जप्त केले आहे.

चीभ-नाक कापले, चटके दिले...

रेणुकास्वामीचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या शरीरावर गरम लोखंडी रॉडने चटके दिल्याच्या खुणा आढळल्या आहेत. याशिवाय, त्याचे नाक आणि जीभही कापण्यात आली असून जबडाही तुटून वेगळा करण्यात आला आहे. याशिवाय, त्याच्या शरीरातील असंख्य हाडे तुटलेली आहेत. त्याच्या कवटीवरही फॅक्चरच्या खुणा आढळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दर्शन आणि पवित्रासह 17 जणांना अटक केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.