पुणे : आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली चालवल्या जात असलेल्या वेश्याव्यवसायाच्या ठिकाणावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल केला असून तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सिंहगड रस्ता परिसरात ही कारवाई करण्यात आली. मसाज पार्लरचालक पूजा दत्तात्रय जगदाळे (वय ३५, रा. धायरी, सिंहगड रस्ता) हिच्याविरुद्ध भादवि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ तसेच भादवि ३७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी फिर्याद दिली आहे.गुन्हे शाखेच्या पोलिसांना सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरामधील एका इमारतीत मोरया आयुर्वेद मसाज पार्लर नावाचे केंद्र असून तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने छापा टाकत याठिकाणी कारवाई केली. या ठिकाणी तीन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून या महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी जगदाळे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.