Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रवास झाला महाग, निवडणूक संपताच टोल दरात एवढ्या टक्क्यानीं वाढ

प्रवास झाला महाग, निवडणूक संपताच टोल दरात एवढ्या टक्क्यानीं वाढ 


लोकसभा निवडणुक 2024 च्या सर्व 7 टप्प्यातील मतदान संपले आणि 2024एक्झिट पोलची आकडेवारीही समोर आली. याचदरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने  अनेक राज्यांमधील टोल दर जाहीर केले, जे सोमवारपासून लागू होतील.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (NHAI) अधिसूचना रविवारी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली, जिथे प्राधिकरणाने टोल दरांमधील बदलांबद्दल माहिती दिली. टोल दर वाढवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने NHAI ला लोकसभा निवडणुकीनंतर घेण्यास सांगितला होता. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल दर वाढवण्याचा आदेश जारी केला. टोलचे दर वाढवण्याची परवानगीही मुख्य कार्यालयाकडून मिळाली. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने टोल दरात वाढ करण्याच्या NHAI च्या प्रस्तावालाही मान्यता दिली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवले ​​असले तरी लोकसभा निवडणुकीमुळे यावर्षी 1 एप्रिलपासून ही टोल दर वाढ लागू झाली नाही.

टोल प्लाझाच्या दरात 3-5 टक्के वाढ
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) च्या अधिकाऱ्याने रविवारी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी संवाद साधला. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून देशातील सुमारे 1,100 टोल प्लाझावर टोल दरात 3 ते 5 टक्क्यांनी वाढ होईल. दुसरीकडे, टोल दर वाढ हा गेल्या काही वर्षांपासून राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दा बनला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानचा असा युक्तिवाद आहे की, त्यांच्या रस्ते प्रकल्पांच्या विस्तारासाठी हे महत्त्वपूर्ण आहे, तर विरोधी पक्ष सर्वसामन्यांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकण्यावरुन त्यांच्यावर टिका करतात.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, टोलनाक्याच्या 20 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या लोकांसाठी मासिक पास बनवण्याचे दरही वाढले आहेत. टोलनाक्याच्या 20 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या लोकांना आता फास्ट टॅगसाठी दरमहा 10 रुपये अधिक द्यावे लागतील. मंथली फास्ट टॅगची किंमत आता 330 रुपयांऐवजी 340 रुपये असेल.
कुठे सर्वात जास्त दर वाढले आणि कुठे कमी?

कानपूर-प्रयागराज महामार्गावर सर्वाधिक टोल दर वाढला आहे. या महामार्गावर कारने प्रवास केल्यास तुम्हाला कमाल 55 रुपये आणि कमीत कमी 5 रुपये टोल भरावा लागेल. फतेहपूरमधील बदोरी टोलनाक्यावर तुम्हाला 55 रुपये जास्त द्यावे लागतील. काटोघन टोलसाठी 40 रुपये जादा लागतील. बाराजोरी, अनंतराम, चामारी (उकासा) या ग्रामीण भागात कानपूर महामार्गावर किमान 5 रुपये अधिक टोल भरावा लागेल. उन्नाव-रायबरेली महामार्गावरील अकवााबाद टोलनाक्यावर 5 रुपये अधिक टोल भरावा लागणार आहे. गेल्या 5 वर्षांपासून या महामार्गावर टोलचे दर वाढवले ​​जात नसल्याने या महामार्गावर दर अधिक वाढले.

कोणत्या वाहनासाठी किती टोल भरावा लागेल?
कार/जीप/हलकी वाहने - जुने दर - 105, नवीन दर - 110

हलके कमर्शियल/लगेज वाहन/मिनी बस - जुने दर - 170, नवीन दर - 175

बस/ट्रक - जुने दर - 355, नवीन दर - 365

थ्री एक्सल कमर्शियल व्हेईकल - जुने दर - रु. 385, नवीन दर - रु. 395

चार ते सहा एक्सल वाहने - जुने दर - 555, नवीन दर - 570

7 एक्सल किंवा मोठ्या आकाराचे वाहन - जुने दर - 680, नवीन दर - 695

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.