Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' मी ' स्वतः प्रदेशाध्यपदाचा राजीनामा देणार ', शरद पवार यांच्या समोरच जयंत पाटलांची खदखद

' मी ' स्वतः प्रदेशाध्यपदाचा राजीनामा देणार ', शरद पवार यांच्या समोरच जयंत पाटलांची खदखद 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा 25 वा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांची खदखद बाहेर आली. माझ्या बाबत काही नाराजी असेल तर जाहीर बोलू नका, ट्विटरवर बोलू नका, थेट शरद पवारांना जाऊन सांगा, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. तसंच नोव्हेंबरनंतर मी स्वत: प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. खासगीमध्ये बोलण्याचं बंद करा, जाहीरपणे बोलण्याचं बंद करा, असं म्हणत जयंत पाटलांनी त्यांची खदखद व्यक्त केली.

भाजप-अजितदादांवर टोलेबाजी

दरम्यान जयंत पाटील यांनी त्यांच्या भाषणात भाजप आणि अजित पवारांवर टोलेबाजी केली. 'येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक आहे, फक्त येणारे चार महिने थांबा. काही लोकांचा प्रयत्न होता, पवारांना बारामतीमध्ये अडकवून ठेवण्याचा. पवारांना बारामतीमध्ये अडकवून ठेवलं की महाराष्ट्र मोकळा होईल, अशी काही लोकांची भावना होती. निवडणुकीत पालथा घालणार नाहीत ते पवार कसले, सुळेंना पराभूत करण्यासाठी डावपेच आखले गेले. रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है शरद पवार', असा टोला जयंत पाटलांनी लगावला.
'शरद पवारांना अनेक आमदार सोडून गेले, मात्र तरीही त्यांनी पुन्हा एकदा पक्ष निर्माण केला. आमचा पक्ष गेला आणि चिन्ह गेलं, तरीही शरद पवारांनी तुतारीच्या चिन्हावरती आठ जण निवडून आणले. पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा कधी बंद होत नाही', असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

'येणाऱ्या काळात युवांना संधी दिली जाईल, नव्या चेहऱ्यांना युवकांना महाराष्ट्रात संधी द्यायची आहे. मी मोदींसारखा 400 चा नारा देणार नाही, माझा प्रयत्न प्रत्येक सीट निवडून आणायचा आहे, ही माझी जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील सरकार किती निकामी आहे, हे आपल्याला जनतेसमोर येऊन मांडायचं आहे. येणाऱ्या चार महिन्यात राज्यात आपलं सरकार येईल', असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.