Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं, बॅनरद्वारे अजित पवारांना डिवचलं

सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं, बॅनरद्वारे अजित पवारांना डिवचलं 


कोल्हापूर :- सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी  मारलंय कुठं, बॅनरद्वारे अजित पवारांना डिवचलं  लोकसभा निवडणूकीच्या अवघे काही महिने आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि शरद पवार तसेच अजित पवार यांचे दोन गट पडले. अजित पवार यांनी सत्तेची कास धरली, त्यांनी पक्ष आणि पक्ष चिन्हावरही ताबा मिळवला.

या निवडणुकीत अजित पवार यांनी महायुतीसोबत निवडणूक लढवली. तर काँग्रेस, शिवसेनेसोबत शरद पवार यांनी महाविकास आघाडी म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली. बारामतीमध्ये तर सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाल्यामुळे पवार वि. पवार असा सामना रंगला होता. त्यामुळे शरद पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.


मात्र बारामतीसह राज्यातील १० पैकी 8 जागांवर जागांवर विजय मिळवला. तर अजित पवार यांच्या पक्षाला अवघी १ जागा जिंकता आली. या निकालानंतर कोल्हापूरमध्ये आता राष्ट्रवादी शरद पवारगटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापूरी शैलीत पवारांची स्तुती करत अजित पवार आणि विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे. बॅनरबाजीतून अजित पवार यांना चांगलाच चिमटाही काढण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला चांगल्याच मिरच्या झोंबल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

काय आहे बॅनर ?
कोल्हापूरमधील दाभोळकर चौक परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेला हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलय कुठं..’ ही अवघी एक ओळ या बॅनरवर आहे, पण त्यातचा निशाणा बरोब्बर लागला आहे. याच बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आणि त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेली तुतारी हा फोटोही असून या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरच्या दाभोळकर चौक परिसरात लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. "सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं…", असा एका ओळीचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. शरद पवारांचा फोटो आणि एका बाजूला पक्षाचे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्हही आहे. रात्री हे बॅनर लागल्यानंतर याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या बॅनरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. या एका ओळीतून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत काय केलं? याची प्रचिती येत असल्याचीही चर्चा सुरू आहे.
राज तिलक की करो तयारी, एक अकेला सबसे भारी .. मातोश्रीसमोरही बॅनरबाजी

दरम्यान बॅनरबाजीचं हे युद्ध मुंबईतही पहायला मिळालं. लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपप्रणित एनडी सरकार स्थापन होत असून उद्या ( 9 जून) नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राहत असलेल्या मातोश्री परिसरामध्ये सत्ताधाऱ्यांनी बॅनरबाजी केली आहे. ‘ राज तिलक की करो तयारी, एक अकेला सबसे भारी…. फिर एक बार मोदी सरकार’, अशा आशयाचा बॅनर मातोश्री बाहेर झळकला. या बॅनरवर नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा बॅनरवर फोटो आहे. उद्धव ठाकरे हे देशाच्या पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू शकतात असं म्हणणाऱ्यांना डिवचण्याचा शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर शिवसेना शिंदे गट आणि उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनरवॉर सुरू आहे. उबाठा पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई यांच्या अभिनंदनाचे सर्वत्र बॅनर लागले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा दिला. आपल्या मतदारसंघातून राहुल शेवाळे यांना ६९ हजार मतदान झाल्याचा बॅनर लावला. दादर माहीम प्रभादेवी विधानसभेमध्ये आपलाच बोलबाला अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. मात्र जिथं कमी मतं पडली ते बॅनर का लावले नाही अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.

हम साथ चले तो जितेंगे … मेधा कुलकर्णींची पोस्ट चर्चेत
राजकीय विरोध विसरून पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी दिल्लीत एकत्र आल्याचे दिसले. यासंदर्भात खासदार मेधा कुलकर्णी यांनी नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत दिल्लीतीर काही फोटो शेअर करत ‘हम साथ चले तो जितेंगे … पुण्याच्या विकासासाठी एक साथ’ असे म्हणत एकत्र काम करण्याचा निर्धार केला. फेसबुक पोस्ट करत खासदार मेधा कुलकर्णी यांनी भावना मांडल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.