अलका याज्ञिक पडल्या 'दुर्मिळ आजाराला बळी
९० च्या दशकातील अनेक हिट गाणी गायलेल्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांच्याशी संबंधित धक्कादायक बातमी समोर येत आहे. गायिका दुर्मिळ विकाराची शिकार झाल्या आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अलका यांना ऐकू सुद्धा येत नाहीये. याबाबत खुद्द अलका यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांच्या पोस्टवर आता चाहते आणि सर्व सेलिब्रिटी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
अलका याज्ञिक यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर द्वारे चाहत्यांनाही मोलाचा सल्ला दिला आहे त्यांनी चाहते, अनुयायी आणि सहकारी गायकांना मोठ्या आवाजातील संगीतापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की,’माझ्या डॉक्टरांनी मला विषाणूच्या झटक्यामुळे दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह श्रवणशक्ती कमी झाल्याचे सांगितले आहे.
या अचानक आलेल्या आजारामुळे मला सुद्धा धक्का बसला आहे. मी याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे, एक दिवस मी माझ्या व्यावसायिक जीवनामुळे माझ्या आरोग्याला झालेल्या हानीबद्दल देखील बोलेन. तुमच्या सर्व प्रेम आणि पाठिंब्याने, मी माझे आयुष्य पुन्हा व्यवस्थापित करण्यासाठी आणि लवकरच तुमच्याकडे परत येण्यास उत्सुक आहे. या महत्त्वाच्या वेळी तुमचा पाठिंबा आणि समज माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण असेल…" त्यांच्या या पोस्टवर गायक सोनू निगम, इला अरुण आणि इंडस्ट्रीतील अनेक मित्रांनी लगेच प्रतिक्रिया दिली तर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.