Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चारचाकीत सुरु होते अवैधरीत्या गर्भ लिंगनिदान :, डॉ. शिंदेसह दलाला अटक

चारचाकीत सुरु होते अवैधरीत्या गर्भ लिंगनिदान :, डॉ. शिंदेसह दलाला अटक 


बारामती : बारामती येथे अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एक डॉक्टर व खासगी इसमावर कारवाई करण्यात आली आहे. या दोघांवर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध).अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली.

गर्भलिंग निदान करणारा डाॅ. मधुकर चंद्रकांत शिंदे (वय ५२, रा. लक्ष्मीनगर, फलटण, जि. सातारा) आणि एजंट नितीन बाळासाहेब घुले (वय ३७, रा. ढेकळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डाॅ. महेश जगताप यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. मधुकर शिंदे हे काही दलांलामार्फत चारचाकी गाडीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन गर्भलिंग निदान करीत असल्याबाबतची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे प्राप्त झालेली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. यमपल्ले यांनी शिक्रापूर, यवत, दौंड, इंदापूर व बारामती येथील वैद्यकीय अधिक्षकांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे यांचे समुचित अधिकारी डॉ. महेश जगताप आणि शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक युवराज बोडके यांनी सापळा रचून दोन इसमांना पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रासहित पकडले. दोन्ही इसमाची विचारपूस केली असता त्यांनी डॉ. शिंदे यांनी दलाल नितिन घुले यांच्या मदतीने माळेगाव येथे एका महिलेचे अवैधरित्या गर्भलिंग चाचणी केल्याचीची कबुली दिली. या प्रकरणी माळेगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.