Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! डिस्चार्जनंतर व्यसनांधीन रुग्णाने इमारतीवरुन मारली उडी, रुग्णांलयात आरडा ओरडा

धक्कादायक! डिस्चार्जनंतर व्यसनांधीन रुग्णाने इमारतीवरुन मारली उडी, रुग्णांलयात आरडा ओरडा 


सांगलीत व्यसनाधीन रुग्णाने मिरज शासकीय रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये चारचाकी वाहनाचे नुकसान झालं आहे. तर रुग्णाचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्याला परत उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
या घटनेमुळे रूग्णालयात मोठा गोंधळ उडाला होता.  याबाबत सविस्तर वृत्त असं की, मिरजेच्या शासकीय रुग्णायात व्यसनाधीन रुग्णाने उपचारापासून पळून जाणाऱ्या रुग्णाने चक्क इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचा प्रकार घडला  आहे. यावेळी खाली थांबलेल्या गाडीवर पडल्याने त्याचे पाय फॅक्चर झाले आहेत. तर गाडीचेही नुकसान झाले आहे. परत त्याला शासकीय रुग्णायलयत ऍडमिट करण्यात आले आहे. 
महंमद गौस रामपुरे (वय ४३) राहणार मिरज चांद कॉलनी, याला दारूचे व्यसन असल्याने त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला  होता. नातेवाईकांनी महमदला १३ जून रोजी मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले  होते. काल त्याला डिस्चार्ज केल्यानंतर नातेवाईक बिल भरण्यासाठी गेले असता महमदने सर्वांची नजर चुकवून आंतररुग्ण विभागाच्या पोर्चवरून उडी मारली यावेळी खाली पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनाच्या टपावर महमद पडला. त्यामुळे परिचारिक गणेश कुंभार यांच्या चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. तर महमदचा पाय फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाला  आहे. उपचारापासून पळून जाणाऱ्या मोहम्मद रामपुरे याला परत मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सांगलीतील मिरज शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.