स्केटींग स्पर्धेत सांगलीच्या आर्यन बारिताया याला रौप्य पदक
किंग्स सर्कल स्केटींग अकॅडेमी पुणे यांच्या वतीने ओपन स्केटींग चॅम्पियनशिप रविवार दिनांक 16 जुन 2024 रोजी पुणे येथे संपन्न झाल्या त्या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यातून सुमारे 800 विविध वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले होते. त्या स्पर्धेत सांगली मिरज कुपवाड रोलर स्केटींग असोसिएशन व सई स्केटींग अकॅडेमी सांगली चा 7 वर्षे वयोगटात क्वाड स्केटींग प्रकारात आर्यन रितेश बारिताया याने 400 मीटर स्पीड स्केटींग रेस मध्ये रौप्य पदकाची कमाई करून सांगली चे नाव स्केटींग खेळात उज्ज्वल केले. त्याला मार्गदर्शन अंतराष्ट्रीय स्केटींग प्रशिक्षक सुरज शिंदे, सौ परवीन शिंदे, आयेशा मुलानी यांचे तर प्रोत्साहन माझी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, पै पृथ्वीराज पवार, उपाध्यक्ष प्रदीप घडशी, वडील रितेश बारिताया यांचे लाभत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.