Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची संधी,' या ' पदासाठी भरती, अर्ज करण्यासाठी शेवटची संधी

आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची संधी,' या ' पदासाठी भरती, अर्ज करण्यासाठी शेवटची संधी 


नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.
आता या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. IDBI बँकेकडून ही भरती राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी झटपट अर्ज करावीत. चला तर मग जाणून या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 160 पदांवर होत आहे. या भरती प्रक्रियेतून एग्जीक्यूटिवची पदे भरली जाणार आहेत. 7 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. idbibank.in. या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. idbibank.in. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. 2 जुलै 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी फक्त शिक्षणाचीच नाही तर वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 20 ते 25 वयोगटातील उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये थोडी सूट देण्यात आली असून 200 फीस ही भरावी लागणार आहे. भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आपण वेबसाईटला भेट देऊ शकता. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. 7 जून 2024 ही भरतीची शेवटची तारीख आहे, त्यानंतर तुम्ही भरतीसाठी अर्ज नाही करू शकत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.