Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शंभूराज देसाईचां राजीनामा म्हणजे निव्वळ स्टंटबाजी :, हर्षद कदमांनी उडवली खिल्ली

शंभूराज देसाईचां राजीनामा म्हणजे निव्वळ स्टंटबाजी :, हर्षद कदमांनी उडवली खिल्ली 


सातारा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पाटण मतदारसंघात कमी मताधिक्य मिळाले आहे. याची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. यावरून उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम  यांनी देसाई यांच्यावर सडकून टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजपला लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश स्वीकारून आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतुन मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. हे प्रकरण ताजे असताना सातारा लोकसभा निवडणुकीत पाटण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना कमी मताधिक्य मिळाले.

महाविकास आघाडीच्या उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मताधिक्य घेतले. त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई  यांचा करिष्मा या मतदारसंघात दिसला नाही. उलट महायुतीची एकजूट पाहायला मिळाली. या कारणावरून शंभूराज देसाई यांनी उदयनराजे यांना मताधिक्य देऊ न शकल्याने आपल्याला मंत्रिपदाच्या जबाबदारीतुन मुक्त करावे, अशी मागणी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहेत.त्यांच्या या भूमिकेची उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी खिल्ली उडवली आहे.त्यांनी देसाई यांच्यावर सडकून टीका केली आहे.
हर्षद कदम म्हणाले, "त्यांना महायुतीच्या उमेदवाराला लीड देता आले नाही, हे त्यांचे अपयश आहे आणि मंत्रिपद सोडण्याचा हा त्यांचा फार मोठा स्टंट आहे. त्यांनी जे गद्दारीकरून मंत्रिपद मिळवले ते त्यांच्याकडून सुटणे अशक्य आहे," खरोखर तुम्ही स्वाभिमानी असाल तर राजीनामा देऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी देसाई यांना दिले आहे.

तुमच्या पाटण मतदारसंघात तुम्ही केलेल्या खोट्या व कागदोपत्री विकासकामांची ही पोच पावती आहे. छोट्या निवडणुकीत तुम्ही पैसे वाटून विजय मिळवला पण लोकांच्या मनात काय आहे हे या निवडणुकीने तुम्हाला दाखवून दिले आहे. आता येणाऱ्या चार महिन्यातील विधानसभा निवडणुकीत लोकच तुम्हाला राजीनामा देण्यास भाग पडतील, कारण तुमचे सगळे काम तुमचा स्वतः चा विकास करण्यासाठी आहे हे लोकांनी ओळखले आहे, असेही ते म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.