Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भावांनो! तुमची बहीण विवाहित असो अथवा अविवाहित, वडिलोपार्जित मालमत्तेत असतो 'इतका' हक्क

भावांनो! तुमची बहीण विवाहित असो अथवा अविवाहित, वडिलोपार्जित मालमत्तेत असतो  'इतका' हक्क 


मुलींच्या वडिलोपार्जितलमत्तेच्या अधिकारावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुलगा लग्नापर्यंतच मुलगा राहतो, पण मुलगी नेहमीच मुलगीच राहते. लग्नानंतर मुलांच्या हेतूत आणि वागण्यात बदल होतो, पण मुलगी ही तिच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आई-वडिलांची लाडकी मुलगी असते.

लग्नानंतर मुलींचे आई-वडिलांवरील प्रेम वाढते. त्यामुळे वडिलोपार्जित मालमत्तेत मुलगीही तितकीच हक्काची राहते. वास्तविक, हिंदू उत्तराधिकार कायद्यात २००५ मध्ये सुधारणा करण्यात आली. पहिल्यांदा वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींनाही हक्क देण्यात आले होते, पण हा अधिकार केवळ ९ सप्टेंबर २००५ नंतर ज्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांनाच मिळत होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यातील तारीख व वर्षाची अट रद्द केली आहे. त्यामुळे आता वडिलोपार्जित मालमत्तेत महिलांना कोणते अधिकार आहेत, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कायद्याचे तज्ज्ञ याविषयी सांगत की….

वडिलोपार्जित मालमत्ता असल्यास

हिंदू कायद्यात मालमत्तेची विभागणी वडिलोपार्जित आणि स्व-अर्जित अशा दोन प्रकारात केली जाते. वडिलोपार्जित मालमत्तेत चार पिढ्यांपूर्वीपर्यंत च्या पुरुषांच्या अधिग्रहित मालमत्तेचा समावेश आहे जे कधीही विभागले गेले नाहीत. अशा मालमत्तेवर मुलांचा जन्मसिद्ध हक्क असतो, मग तो मुलगा असो वा मुलगी. २००५ पूर्वी अशा मालमत्तेवर केवळ मुलांचा च अधिकार होता, पण दुरुस्तीनंतर अशा मालमत्तांच्या विभागणीत वडील मुलीला वाटा नाकारू शकत नाहीत. कायद्याने मुलीचा जन्म होताच वडिलोपार्जित मालमत्तेवर तिचा हक्क असतो.

वडिलांची स्वत:ची मालमत्ता
स्व-अर्जित मालमत्तेच्या बाबतीत मुलीची बाजू कमकुवत असते. वडिलांनी स्वत:च्या पैशातून जमीन विकत घेतली असेल, घर बांधले असेल किंवा विकत घेतले असेल तर ही मालमत्ता तो ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतो. स्वत:ची मालमत्ता स्वत:च्या मर्जीने कोणालाही देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकार आहे. म्हणजे वडिलांनी आपल्या मालमत्तेत मुलीला वाटा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीकरू शकत नाही.
इच्छापत्र न लिहिता वडिलांचा मृत्यू झाला तर

इच्छापत्र लिहिण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास त्याच्या मालमत्तेवर सर्व कायदेशीर वारसांचा समान हक्क असेल. हिंदू उत्तराधिकार कायद्यात पुरुष वारसदारांचे चार प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून वडिलांच्या मालमत्तेवरील पहिला हक्क वारसदारांच्या पहिल्या वर्गाचा आहे. त्यात मुलींचाही समावेश आहे. म्हणजे वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा पूर्ण हक्क आहे.

जेव्हा मुलीचे लग्न होते
२००५ पूर्वी हिंदू उत्तराधिकार कायद्यात मुलींना केवळ हिंदू अविभक्त कुटुंबातील (HUF) सदस्य मानले जात होते, म्हणजेच समान वारस दार नव्हते. मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला हिंदू अविभक्त कुटुंबाचा (HUF) भागही मानले जात नव्हते. २००५ च्या दुरुस्तीनंतर मुलीला समान वारसदार मानण्यात आले आहे. आता मुलीच्या लग्नाने वडिलांच्या मालमत्तेवरील त्याचा हक्क बदलत नाही. म्हणजे लग्नानंतरही वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क असतो.

मुलीचा जन्म २००५ पूर्वी झाला असेल, पण वडिलांचा मृत्यू झाला असेल हिंदू उत्तराधिकार कायद्यातील दुरुस्ती ९ सप्टेंबर २००५ पासून अंमलात आली. या तारखेपूर्वी किंवा नंतर मुलीचा जन्म झाला तरी वडिलांच्या मालमत्तेत तिचा भावाइतकाच वाटा असेल, असे कायद्यात म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.