Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भेंडवडेच्या तरूणाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक, दारूच्या नशेत केले कृत्यरागाने पाहिल्याच्या कारणावरून डोक्यात घातला दगड, बारा तासांच्या आत कारवाई

भेंडवडेच्या तरूणाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक, दारूच्या नशेत केले कृत्यरागाने पाहिल्याच्या कारणावरून डोक्यात घातला दगड, बारा तासांच्या आत कारवाई


सांगली :  सांगलीतील मंगळवार बाजार परिसरातील राजूनगर येथे भेंडवडे (ता. हातकणंगले) येथील तरूणाच्या खूनप्रकरणी बारा तासांच्या आत तिघांना अटक करण्यात आली आहे. रागाने पाहिल्याच्या तसेच शिवीगाळ केल्याच्या कारणावरून हे कृत्य केल्याची कबुली प्राथमिक तपासात संशयितांनी दिल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी दिली.  

प्रतीक रामचंद्र शितोळे (वय २३, रा. शामनगर, कुपवाड), गणेश जोतिराम खोत (वय ३०, रा. माळी वस्ती, संजयनगर, सांगली), सिद्धनाथ राजाराम लवटे (वय २५, रा. माळी गल्ली, संजयनगर, सांगली, मूळ रा. एरळे, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मयुरेश यशवंत चव्हाण (वय ३०, रा. भेंडवडे, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. मृत मयुरेश सांगलीतील एका रूग्णालयात केअर टेकर म्हणून काम करत होता. सोमवारी रात्री तो काम संपल्यानंतर रूग्णालयातून निघाला होता. शहरातील मंगळवार बाजार परिसरातील राजूनगर येथे त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 
मयुरेश याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले. पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला. पोलिसांची पथके संशयितांचा शोध घेत होती. त्यावेळी संजयनगर पोलिसांच्या पथकाला हा खून तीन संशयितांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दारूच्या नशेत असताना मयुरेश याने रागाने पाहिल्याने तसेच शिवीगाळ केल्याने डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची कबुली दिली. मयुरेश यानेही मद्य प्राशन केले असावे असा पोलिसांना संशय आहे. दारूच्या नशेतच ही घटना झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर मयुरेश याने मद्य प्राशन केले होते की नाही हे स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. शिवाय मयुरेश राजूनगर भागात का गेला होता याचाही तपास पोलिस करत आहेत. 

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, संजयनगरचे निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या मार्गदर्शनाने सूरज सदामते, विनोद साळुंखे, नवनाथ देवकते, अशोक लोहार, दीपक गायकवाड, सुशांत लोंढे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.