परमेश्वरासाठी बळी देण्याच्या नावाखाली प्राणी-पक्ष्यांच्या बेकायदा कत्तलीवर बंदी घातल्याचे आदेश पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालकांनी काढले होते.
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आवारातील दर्ग्यावर पूर्वापार चालत आलेल्या पक्षी व प्राण्यांचा बळी देण्याच्या प्रथेवर प्रशासनाने घातलेली बंदी उठली आहे. या ठिकाणी बकरी ईद आणि उरूसला कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
गेल्या वर्षी १ फेब्रुवारीला या प्रथेवर सरकारने बंदी घातली होती. पुरातत्त्व विभागाने याबाबत आदेश काढला असून परमेश्वरासाठी बळी देण्याच्या नावाखाली प्राणी-पक्ष्यांच्या बेकायदा कत्तलीवर बंदी घातल्याचे आदेश पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालकांनी काढले होते. त्यानंतर विविध प्रशासनांनी बंदीचे आदेश काढले.
याविरोधात हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्गा ट्रस्टने ॲड. सतीश तळेकर, ॲड. माधवी अय्यपन यांच्यामार्फत याचिका केली असून त्यावर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. काल (ता. १४) न्या. बी. पी. कोलाबावाला यांनी हा निकाल जाहीर केला आणि याचिकाकर्त्यांची मागणी मान्य केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.