Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला बांधले गेटला अन....

नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला बांधले गेटला अन....


छत्रपती संभाजीनगर : नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नीने पतीच्या मैत्रिणीला दिवसभर गेटला बांधून चोप दिल्याची घटना वाळूज एमआयडीसी भागात घडली आहे. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेची सुटका केली.


नवऱ्याने पत्नी आणि मुलांना चार महिन्यांपुर्वी घराबाहेर काढले होते. मैत्रिणीसोबत असलेल्या नवऱ्याला धडा शिकवण्याचे पत्नीने ठरवले. पत्नीचे भावाच्या मदतीने नवरा आणि त्याच्या मैत्रिणीला चोप दिला. शिवाय, नवऱ्याच्या मैत्रिणीला घराच्या गेटला दुपारपर्यंत बांधून ठेवले आणि मारहाण केली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि महिलेची सुटका केली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
नवरा हा वडगाव परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहात असून, तो एका कंपनीत सुपरवायझरचं काम करतो. काही दिवसांपुर्वी त्याची एका महिलेसोबत ओळख झाली होती. यानंतर दोघांची जवळीक वाढल्याने इकडे पती पत्नीचे खटके उडू लागले. पती-पत्नीचा वाद विकापाला गेल्यानंतर तीन महिन्यांपुर्वी पतीने पत्नी आणि दोन मुलांना घराबाहेर काढले आणि एकटाच राहू लागला.

पत्नी घरातून गेल्यानंतर पतीने त्याच्या मैत्रीणीला घरी आणून ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी पत्नी रांजणगावात आपल्या भावाला भेटण्यासाठी आली होती. बुधवारी ती भावाला सोबत घेऊन सकाळच्या सुमारास आपल्या घरी वडगावात गेली. यावेळी पती आणि त्याची मैत्रीणीला रंगेहात पकडले. यामुळे संतापून तिने आणि तिच्या भावाने पती आणि त्याच्या मैत्रिणीला चांगलाच चोप दिला. शिवाय, हायपाय बांधून तिला घराच्या चॅनल गेटला बांधून ठेवले होते. पोलिसांनी सुटका केली असून, पुढील तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.