तंत्रज्ञानाच्या युगात हातात मोबाईल आल्यापासून आयुष्य सोप होऊन गेलं आहे. आधी मनुष्य प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायचा, पण आता तो मोबाईलवर सर्च करतो. पण स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. अशा काही परिक्षा असतात ज्यात तुमच्या बुद्धीमतेचा कस लागतो. यावेळी मोबाईल तुमच्या कोणत्याच उपयोगी पडत नाही. अशा वेळी आवश्यक असतं भरपूर वाचन आणि सामान्य ज्ञान. इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, कला आणि क्रीडा अशा प्रत्येक गोष्टींची माहिती आणि वाचन असणं आवश्यक आहे. यामुळे समाजात वावरताना आपल्याला एक पाऊल पुढे राहण्यास मदत होते. त्यामुळेच वाचकांसाठी आम्ही सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न घेऊन आलोय. जे मनोरंजक तर आहेतच शिवाय तुमच्या बुद्धीमतेला चालना देणारे देखील आहेत.
प्रश्न 1 - भारतातील कोणत्या राज्यात पूर्णपणे दारूबंदी आहे?
उत्तर - भारतातील बिहार राज्यात दारू विक्री आणि खरेदीवर बंदी आहे.
प्रश्न 2 - हिऱ्यांचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होतं.
उत्तर - हिऱ्यांचं सवार्धिक उत्पादन हे रशियात होतं.
प्रश्न 3 - भारतातील पहिली मेट्रो सेवा कधी सुरु झाली होती.
उत्तर - भारतातील पहिल्या मेट्रो रेल्वे सेवेला कोलकात्यात 24 ऑक्टोबर 1984 मध्ये सुरुवात झाली होती.
प्रश्न 4 - इंग्रजांनी भारतातील पहिला कारखाना कुठे सुरु केला होता.
उत्तर - इंग्रजांनी भारतातील पहिला कारखाना गुजरातमधील सूरत शहरात केला होता.
प्रश्न 5 - भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला?
उत्तर - मध्य प्रदेशमधल्या महू या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं स्मारक आहे. याचठिकाणी भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं जन्मस्थान आहे. 14 एप्रिल 1891 ला महूमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.
प्रश्न 6 - दूधाच्या चहाबरोबर कोणतं फळ खाल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो?
उत्तर - दूधाच्या चहाबरोबर लिंबू खाल्यास माणासाचा मृत्यू होऊ शकतो.
प्रश्न 7 - टेबल टेनिस खेळाचा अविष्कार कोणत्या देशात झाला?
उत्तर - टेबल टेनिसचा अविष्कार इंग्लंडमध्ये झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.