Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीचा ठाकरेनां फोन, काहीतरी मोठं घडणार?????

फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीचा ठाकरेनां फोन, काहीतरी मोठं घडणार?????


महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. देशात पुन्हा मोदी सरकार येणार का? याचा निकाल लागायला आता फक्त अवघे काही तास उरले आहेत.

असं असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भूमिका आगामी काळात अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाऊ शकतात, अशा चर्चांना जबरदस्त उधाण आलं आहे. असं घडलं तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय होणार? हा देखील प्रश्न आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी याबाबत बोलताना एकनाथ शिंदे हेच आमचे नेते असणार असं म्हटलं होतं. पण भाजपच्या गोटात पडद्यामागे काहीतरी वेगळं घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीने उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीकडून लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीने उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता भेटीची वेळ मागितली आहे.

उद्धव ठाकरेंनी अद्याप तरी त्या नेत्याला भेटीची वेळ दिलेली नाही. पण त्या नेत्याचं म्हणणं आहे की, उद्या निकाल लागल्यानंतर मला सदिच्छा भेट घ्यायची आहे. मला उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता ठाकरेंची भेट घ्यायची आहे. त्यामुळे मला भेटीची वेळ देण्यात यावी, असं या नेत्याचं म्हणणं होतं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्याची भेट होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रसाद लाड यांच्याकडून खुलासा

दरम्यान, संबंधित वृत्त समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी संबंधित वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. आपल्याबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा खुलासा आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.

“मीडियामध्ये ज्या पद्धतीने अशा प्रकारचं पर्सेप्शन निर्माण केलं गेलं की, आम्ही उद्धव ठाकरेंना फोन करुन भेटीची वेळ मागितली, ही अतिशय धांद्यात खोटी आणि चुकीची माहिती पसरवल्याचा प्रयत्न केला गेला आहे. ना आम्हाला उद्धव ठाकरेंची गरज होती, ना आहे आणि ना भविष्यात कधी लागेल. निश्चितपणे कुणीतरी पर्सेप्शन करण्यासाठी ही माहिती पसरवली आहे. महाविकास आघाडीचा पराभव पूर्णपणे दिसतोय. मोदी सरकार पुन्हा येणार ते दिसतंय. महाराष्ट्रातला महायुतीचा विजय समोर दिसायला लागलाय. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवण्याचं काम चालू आहे. त्याचा मी निषेध करतो”, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.